Latest News

(म्हणे) ‘भारत हिंदु राष्ट्र बनला, तर काश्मीर स्वतंत्र होईल !’ – फारूक अब्दुल्ला यांचे फुत्कार

काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे आणि 
ते पुढे हिंदु राष्ट्रातही रहाणार, हे अब्दुल्ला यांनी लक्षात ठेवावे !
Image result for फारूक अब्दुल्ला

       श्रीनगर – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जर भारताला हिंदु राष्ट्र म्हणत असतील, तर आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, काश्मीर हिंदु राष्ट्राचा भाग रहाणार नाही, त्याला वेगळे करण्यात येईल, असे देशद्रोही विधान नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी येथे केले. ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते. तसेच त्यांनी भागवत यांच्यावर राज्यघटनेच्या विरोधात बोलल्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली. 
     मोहन भागवत यांनी नुकतेच जम्मूमध्ये संघ स्वयंसेवकांसमोर बोलतांना ‘भारत हिंदु राष्ट्र आहे; कारण आपले पूर्वज हिंदु होते’, असे विधान केले होते. 
     अब्दुल्ला यांनी असेही स्पष्ट केले की, काश्मीर कधीही पाकचा भाग बनणार नाही. पाकमध्ये अद्यापही जमीनदारांकडे सर्व संपत्ती आहे आणि गरीब व्यक्तींची स्थिती दयनीय आहे.

via Blogger http://ift.tt/2gw4WOv




from WordPress http://ift.tt/2gw1eoa
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.