Latest News

धर्माभिमान्यांनी धर्मजागृती सभेत कृतीशील सहभागी होऊन सभा यशस्वी करावी ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

बैठकीत धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना श्री. सुनील घनवट

  • हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने…
  • कागल (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्माभिमान्यांची बैठक
       कागल-  – देशात हिंदु धर्मावरील आणि हिंदूंवरील अत्याचारांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यकर्त्यांच्या मवाळ धोरणामुळे भारतातच हिंदूंना विस्थापित होऊन जीवन जगावे लागत आहे. आपल्यावरील अत्याचाराच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. हे संघटन कसे उभारायचे, याची माहिती जाणून घेण्यासाठी कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत धर्माभिमान्यांनी कृतीशील सहभाग घेऊन सभा यशस्वी करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. सभेनिमित्त १७ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ७ वाजता धर्माभिमान्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. 
       समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी सभेचा उद्देश आणि सभेला उपस्थित रहाणार्‍या वक्त्यांची सविस्तर माहिती दिली. बैठकीत हिंदुत्वनिष्ठ कशा प्रकारे सहकार्य करू शकतात, याविषयी चर्चा झाली. यानंतर ५ गावांमध्ये धर्माभिमान्यांच्या बैठकांचे आयोजन करणे, २ ठिकाणी होंर्डिग्ज लावणे आणि पत्रके वितरित करणे, अशा प्रकारे धर्माभिमान्यांनी सहभाग दर्शवला. 
सभेसाठी कृतीशील 
होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! 
क्षणचित्रे
१. शिवसेनेचे कागल शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी यांनी स्वतःच्या दुकानात बैठकीचे आयोजन केले. तसेच धर्मसभेच्या प्रचारात प्रतिदिन वेळ देण्याची इच्छा व्यक्त केली. 
२. श्री. अजय लोहार यांनी सभेच्या प्रसारासाठी स्वतःची दुचाकी उपलब्ध करून देण्याची सिद्धता दर्शवली. 
उपस्थित मान्यवर…
       वाहतूक सेनेचे सर्वश्री म्हाळू करीकट्टे (कागल), श्री शिवप्रतिष्ठानचे दिलीप पाटील आणि रामचंद्र पाटील (मौजे सांगाव), बजरंग दलाचे विनायक आवळे, भरत शेटे (कसबा सांगाव), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रणीत कुन्नर (कागल), भाजपचे शिरीषकुमार निगवे (रणदेवीवाडी), सचिन कांबळे (लिंगनूर), शिवसेनेचे प्रभाकर थोरात (कागल) आदी उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2grhxlo




from WordPress http://ift.tt/2g8Tzsb
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.