| रावसाहेब दानवे पाटील |
| श्री प्रवीण पोटे पाटील |
| अरूण अडसड |
| श्री रामदास तडस (खासदार) |
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
चांदुर रेल्वे नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी होऊ घातलेली निवडणूक आठ दिवसांवर येवून ठेपली असल्याने निवडणूक प्रचाराची रंगत वाढली असून भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रमोद नागमोते व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभेचे आज रविवारी आयोजन करण्यात आले आहे.
सिनेमा चौक येथे आयोजीत प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब दानवे राहणार असुन प्रमुख वक्ते महणुन पालकमंत्री प्रविण पोटे, माजी आमदार अरूण अडसड, खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय पक्षाची ही पहिलीच प्रचार सभा शहरात होत आहे. तरी या सभेला शहरवासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपच्या सर्व उमेदवारांनी, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी केले आहे..
via Blogger http://ift.tt/2g7jDGk
from WordPress http://ift.tt/2fQjJzb
via IFTTT
No comments:
Post a Comment