Latest News

हिंदु धर्मजागृती सभेला शिवसेनेकडून सर्वतोपरी साहाय्य केले जाईल ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

आमदार श्री. राजेश क्षीरसागर (उजवीकडे)
यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देतांना धर्माभिमानी

       कोल्हापूर – येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर या दिवशी भव्य हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे निमंत्रण येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांना समितीच्या कार्यकर्त्यांनी दिले. या वेळी सभेचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने होर्डिंग्ज लावले जाईल आणि शिवसैनिकही सभेत सहभागी होतील. सभेसाठी शिवसेनेकडून सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. समितीच्या शिष्टमंडळाने १८ नोव्हेंबर या दिवशी श्री. क्षीरसागर यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सर्वश्री सुनील घनवट, कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे, मधुकर नाझरे आदी या वेळी उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2grhS7E




from WordPress http://ift.tt/2gw6to2
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.