Latest News

चांदुर रेल्वे नप मध्ये सत्ता द्या, सरकारकडुन 200 कोटींचा निधी आणुन देणार- रावसाहेब दानवे पाटील

 राज्यात भाजपाची सत्ता येताच संपूर्ण राज्याचा कायापालट झाला.
हजारोच्या संख्येने महिला पुरुषांनी सभेला केली गर्दी

चांदुर रेल्वे – / (फोटो/ न्यूज /- शहेजाद खान)


केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. आणि यामुळे आज संपूर्ण देशासह राज्यात जनतेच्या हितासाठी वेळोवेळी निर्णय घेतले जात आहे. आणि आज राज्याचे परिस्थिती पाहता संपूर्ण राज्य सुजलाम-सुफलाम झाले आहे. यामुळे आपल्या नप मध्ये भाजपा ची सत्ता आना आणि संपूर्ण शहराचा भक्कम पणे विकास करून घ्या यासाठी निधीची कोणतीही कमतरता पळू देणार नाही. असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाद्याक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी चांदुर रेल्वे येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी सामान्य माणसाचे जीवनमान कसे उंचावेल व त्यांना कसा न्याय मिळेल यासाठी सदोदित प्रयत्न चालविले आहे. आज संपूर्ण देशात महिलांना चुलीच्या धुरापासून दूर ठेवण्यासाठी देशातील दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा संकल्प केला आणि आज ती योजना भरभक्कम पणे राबविल्या जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी मागे नाही आहे. महाराष्ट्र शासनाने जनसामान्यांसाठी जलयुक्त शिवार योजना पाणी अडवा, पाणी जिरवा, तसेच शेतकरी कुटुंबियांसाठी 3 रुपये किलो तांदूळ व 2 रुपये किलो गहू, तसेच इतर जीवनावश्यक वस्तू, अल्प दरात देण्याचा शासनाचा सपाटा सुरु असून यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनमान उंचावले आहे.

राज्यात नवनवीन उद्योग धंद्यांना चालना देऊन बेकारी दूर कशी करता येईल यावर भर देण्यात आलेला आहे. आदी सर्व बाबींना लक्षात घेऊन आपण केंद्रात, राज्यात जस भाजपा सरकार आहे, तसेच चांदुर रेल्वे नगरपालिकेत सुद्धा भाजपा ची सत्ता आणून आपल्या शहराचा सर्वांगीण विकास साधा या विकासासाठी जर चांदुर रेल्वेत भाजपा ची सत्ता आल्यास भाजपा सरकारकडून 200 कोटी रुपये आणून देण्याचं हमी हि यावेळी भाजपा प्रदेशाद्याक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी यावेळी दिली.

काँग्रेस च्या तत्कालीन शासनावर यावेळी रावसाहेब दानवे पाटील यांनी जबरी टिका केली, यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस शासनाने दलित मुस्लिम बांधवांना केवळ भूलथापा देऊन खोटी भीती दाखवून नियमित सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न केला. परंतु या समांजबांधवांनी आता हा प्रयत्न हाणून पाडला असून दलित मुस्लिम बांधव आज बहुतांश भाजपाच्या पाठीशी भरभक्कम पणे उभा आहे. यामुळे भाजपाची सत्ता येण्यास वेळ लागणार नाही असेही दानवे पाटील यांनी म्हटले.

यावेळी मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, भाजपा जेष्ठ नेते माजी आ.अरुण अडसड, राज्याचे सरचिटणीस डॉ.रामदास आंबडकर, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष रवींद्र उपाध्याय, यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रमोद नागमोते, तसेच इतर प्रभागातील उमेदवार बाळासाहेब सोरगिवकर, संजय मोटवानी, विजय काळसर्पे, निलिमा शर्मा, मनीषा वऱ्हाडे, सचिन लांजेवार, सुरेखा तांडेकर, गोपाल गणेडीवाल, सुचिता बगाडे, गजानन ठाकरे, सविता डोनेकर, उषा मेश्राम, किशोर क्षीरसागर, सारीका तिवारी, संजय पुरसाम, रेखा नागणे, दिपाली मिसाळ, आदींची उपस्थिती होती. सभेला छोटू विश्वकर्मा, जाकीर भाई, ऍड.राजीव अंबापुरे, वासुदेव मानकानी, उत्तमराव ठाकरे, सचिन जयस्वाल, सुषमा खंडार, धिरेंद्र खेरडे, बबनराव गावंडे, गुड्डू बजाज, रमेश वाट, पराग मेंढे, मालिनी वाघ, अमोल अडसड, संदीप सोळंके, यांसह शेकडो कार्यकर्ते, शहरवासी हजर होते.

via Blogger http://ift.tt/2eTC0yZ




from WordPress http://ift.tt/2gaMqYd
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.