Latest News

ब्राह्मणद्वेष पसरवणार्‍यांच्या विरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून तक्रार प्रविष्ट

पोलीस निरीक्षकांना निवेदन
देतांना महासंघाच्या महिला कार्यकर्त्या
     पुणे- शिवप्रतिष्ठान संस्थेचे नागपूर येथील कार्यकर्ता शंकर चव्हाण यांनी फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून ब्राह्मण समाज आणि महिला यांच्याविषयी अश्‍लाघ्य विधाने केली आहेत. याची गंभीर नोंद घेत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने येथील फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक दीपक पायगुडे यांच्याकडे १६ ऑक्टोबर या दिवशी चव्हाण यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. 
      या वेळी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी चव्हाण यांच्यावर लवकरात लवकर कठोर करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही सांगितले. महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री. विश्‍वजीत देशपांडे, जिल्हाध्यक्ष श्री. आनंद दवे, प्रदेश युवाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत धडफळे, जिल्हा युवाध्यक्ष श्री. अविनाश कुलकर्णी, अधिवक्ता अर्चिता जोशी यांसह महासंघाचे अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 
      शंकर चव्हाण यांच्या विरोधात आतापर्यंत रत्नागिरी, संभाजीनगर, बदलापूर आणि नागपूर या ठिकाणी पोलीस तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

via Blogger http://ift.tt/2efIWFh




from WordPress http://ift.tt/2dpDP0K
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.