Latest News

*अचलपूर नगराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साजरा केला विजयादशमीच्या उत्सव*

अचलपूर:-/ प्रमोद नैकेले /–
 अचलपूर नगराचा वार्षिक १६ आँक्टोंबर ला मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.याप्रसंगी परतवाडा शहरातील प्रमुख रस्त्यावरून स्वयंसेवकांनी गणवेशात पथसंचलन केले.
विजयादशमीच्या निमित्ताने स्वयंसेवक संघाचा अचलपूर नगरातील सर्व स्वयंसेवकांनी वार्षिक उत्सव स्थानीक नगरपालिका माध्यमीक शाळेचे पटांगणात साजरा करण्यात आला.या निमित्त शहरातील प्रमुख रस्त्यावरून पुर्ण गणवेश धारण करून बँड पथकाचे सह भव्य पथसंचलन केले.पथसंचलन नगरपालिका माध्यमीक शाळेचे पटांगणात येवून तेथे योग व कवायत करण्यात आली.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष शहरातील नामांकीत हिरो टूव्हीलरचे वितरक साईनाथ मोटर्सचे संचालक धनंजय नाकील यांचे अध्यक्षतेखाली ध्वज पुजन व प्रणाम घेण्यात आला प्रमुख वक्ता म्हणून नागपूर येथील पुरुषोत्तमजी दिवटे यांनी बौध्दिक मार्गदर्शन करतांना संघ निर्मिती मागील संकल्पना समजावून सांगितली.पुज्यनीय डाँ.हेणगेवार २७ सप्टेंबर १९२५ विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना नागपूर येथील मोहिते वाड्यात केली.संघाचे ध्येय सत्तास्थापन्याचे नसून हिंदुस्तानात हिंंदृचे संघटन मजबूत करणे होते.हिंदू देवदेवतांचे हातात शस्त्र असते म्हणून याप्रसंगी उत्सावात शस्त्र पुजन करण्यात येते.संघ शस्त्राचा ऊपयोग कुणाला मारण्यासाठी करीत नाही तर स्वसंरक्षणासाठी तसेच दुर्बल घटकांच्यावर होणा-या अत्याचारापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी करतो.संघ शाखेत देशद्रोह शिकवील्या जात नाही ऊलट देशभक्ती सोबत संस्कार तरूण मुलामुलींना दिल्या जातात.आज फँशनच्या नावावर नाश पावत चाललेली संस्कृती भविष्यात घातक ठरू शकते.तसेच देशात मोठया प्रमाणात होत असलेले धर्मांतरण हा चिंतनाचा विषय आहे.आपल्याच काही घटकांना परकीय धर्मांणरणाकरीता विविध आमीष दाखवून प्रवृत्त करीत आहेत याचे मुख्य कारण आपण त्यांच्या जवळ जाऊन त्यांना आपले समजत नाही हे आता बदलने गरजेचे आहे अन्यथा आपले अस्तित्व सुध्दा धोक्यात येऊ शकते.
स्वयंसेवक संघाला काही लोक बदनाम करण्यासाठी विविध कारणांनी देशात बंदी घालण्याचा सुध्दा प्रयत्नात आहेत याप्रकारचे आजपर्यंत तिन वेळा प्रयत्न झाले आहेत हे विसरून चालणार नाही म्हणून प्रत्येक हिंदूने संघ शाखेत गेले पाहिजे.थोडातरी वेळ देशसेवेसाठी खर्च केला पाहिजे.डाँ.हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघाला परपुज्यनीय गुरुजींनी अखीलभारतीय स्वरूपातून बाहेर देशात पोहचवले आज अनेक देशात संघाच्या शाखा आहेत.संघाचे असंख्य सेवाप्रकल्प आहेत.यामधून गरजू लोकांची सेवा केल्या जाते.जवळपास देशात 1लाख 87000 सेवा प्रकल्प चालतात.सरसंघचालक डॉ.हेडगेवार यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे आपण त्यांचे संगोपण केले पाहिजे असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय भाषणात धनंजय नाकील यांनी आपल्या यशस्वी वाटचालीबाबत सांगून विजयादशमीच्या व स्वयंसेवक संघाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी विचारमंचावर नगरसंघचालक दिवाकरजी कुळकर्णी,सहकार्यवाह चंदु देशपांडे उपस्थीत होते कार्यक्रमांचे संचलन व आभार नगरकार्यवाह सुधीरजी तारे यांनी केले कार्यक्रमाला शहरातील नागरीक व स्वयंसेवक स्त्रीपुरुषानं युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2ek4sdR




from WordPress http://ift.tt/2dzuE14
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.