Latest News

ज्ञान प्रबोधिनी सार्वजनिक वाचनालय सरमसपूरा अचलपूर येथे जिल्हाधिकारी श्री किरणजी गीत्ते यांची भव्य पुस्तक तुला संपन्न



अचलपूर / प्रमोद नैकेले – 

ज्ञान प्रबोधिनी सार्वजनिक वाचनालय सरमसपूरा येथे निर्माण करावे ही संकल्पना घेऊन पुस्तक प्रेमी मित्रमंडळी यांनी जिल्हाधिकारी किरणजी गीत्ते यांच्या प्रेरणेतुन करीअर मार्गदर्शन व त्यांची भव्य पुस्तक तुला करण्याचे ठरवले आज १७ जानेवारी २०१७ रोजी स्थानीक कल्याण मंडपम येथे हजारो विद्यार्थी व पुस्तकप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

     कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष्या सौ सुनिता नरेंद्र फिसके,सत्कार मुर्ती श्री किरणजी गीत्ते सपत्नीक उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणुन नरेंद्र फिसके,अ.वा.सूर्यवंशी जिल्हा ग्रंथालय अधिकारी,डाँ.व्यंकटजी राठोड उपविभागीय अधिकारी अचलपूर,तहसिलदार श्री मनोज लोणारकर,चांदुरबाजार नगराध्यक्ष श्री रविजी पवार,गोंविंदभाऊ कासट,प्रा.वसंतराव शिरभाते,विजय गुरलेकर,तिरमारे,नगरसेवक गोवर्धन मेहरे,विवेक सोनपरोते व छायाताई भागवत आदी मान्यवर उपस्थीत होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक व वाचनालयाचे संयोजक विलास बेलसरे,विनय चतुर,बंडू काटे,नितीन भुयार,अशोक बेंडे,शंकरराव काळे,मधुकर राऊत,युवराज परीहार,राजेश्वर गोतमारे,निशांत विखार,प्रमोद हरीमकर,नितीन केवाळे,धनंजय लव्हाळे व सर्व सदस्य ज्ञान प्रबोधिनी वाचनालय यांनी किरणजी गीत्ते यांची लोकसहभागातून प्राप्त पुस्तकांनी तुला केली अचलपूर ऐतिहासिक शहराच्या इतिहासात प्रथमच अशी पुस्तकतुला झाली.याप्रसंगी रवीजी पवार व सुनिताताई फीसके यांनी संबोधित केले व या उपक्रमाचे अभिनंदन केले मुख्य मार्गदर्शन किरणजी गीत्ते यांनी करतांना उपस्थीत विद्यार्थ्यांना काही सूचना देत म्हटले की जिवनात यशस्वी होण्याकरिता प्रथम उद्देश व लक्ष ठेवण्यात यावे व त्या लक्षाचा पाठलाग करण्याची तयारी केली पाहिजे.पालकांनी आपल्या पाल्यावर आपले निर्णय व अपेक्षा लादु नये त्यांचा कल जाणून त्या दृष्टीने वाटचाल करण्यास त्यांना मुभा व सहकार्य करावे.विद्यार्थ्यांनी  साठ टक्के अभ्यासक्रम व चाळीस टक्के इतर पुस्तकांचे वाचन करावे.लक्ष प्राप्ती करीता सतत अभ्यास व सराव करीत राहणे उत्तम आहे.एपीएसी व युपीएससी अशा स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सामान्य ज्ञान व आकाश व जमीन या मधील प्रत्येक गोष्टीचे ज्ञान संकलित करावे.दुस-यांची टाचने वाचन्यापेक्षा पाठ्यपुस्तके वाचून स्वतः नोंदी ठेवून स्वताचे टाचन काढून त्यांचे वाचन करावे.अभ्यास करतांना तयार साहित्य वापरण्यापेक्षा शिक्षण मंडळ,एनसीईआरटी व विद्यापीठाने प्रचलित केलेल्या पुस्तकांचे वाचन करावे.आपण केलेल्या सरावाची दुस-याकडून तपासणी करून खात्री करून घ्यावी.प्रत्येक परीक्षा देण्यापेक्षा आपले ध्येय निश्चित करुन ते पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा.या वाचनालयाच्या निर्मीती निमित्ताने केलेल्या या उपक्रमाबद्दल विलास बेलसरे व सर्व सहका-यांचे अभिनंदन करीत या वाचनालयास आवश्यक फर्नीचर व इमारती करीता आवश्यक शासकीय नीधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय चतुर,आभार प्रदर्शन वंदनाताई गोतमारे तर कार्यक्रमाचे संचलन प्रमोद नैकेले यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षण संस्था,कोंचींग क्लासेस,सामाजिक संघटना,पुस्तकप्रेमी नागरीक,नगरपरीषद व महसुल विभाग यांनी सहकार्य केले व बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेतला कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गजानन  जायदे,प्रशांत पाटणकर,अगंद दाभाडे,विलास भागवत,रवी सोनपरोते,दिलीप गोरडे,खुशाल निमजे,गणेश निमजे,गणेश हरिमकर,भारत आकोलकर,संजय भोपाळे,अजय भागवत,योगेश पखाले,प्रदीप माहोरे,अंकुश माहोरे,तुषार माहोरे,शुभम,अमोल,निरंजन,श्रीराम माहोरे,प्रशांत राऊत,आशिष बोकडे,हेमंत,शुभम काळणे, सागर काटे व समस्त पुस्तक प्रेमी मित्रमंडळी सरमसपुरा तसेच अचलपूर परतवाडा नगरीतील गणमान्य नागरीक व पुस्तक प्रेमींनी परीश्रम घेतले.

via Blogger http://ift.tt/2iJYWAR




from WordPress http://ift.tt/2jktYy2
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.