Latest News

नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत स्नेह संमेलनाच्या क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन 

मोईन खान / परभणी- / –

येथील संजीवनी शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत स्नेह संमेलनाच्या क्रिडा महोत्सव 2017 चे उद्‌घाटन प्राचार्य सुरेश नाईकवाडे याच्या हस्ते करण्यात आले.

क्रिडा महोत्सव 2017 अंतर्गत क्रिकेट खो-खो कबडी धावणे उंचवडी लांबउडी स्लोसायकलींग संगित खुर्ची रंग भरणे, सामान्य ज्ञान निंबध स्पर्धा आदीचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रिडा महेात्सव अंतर्गत आज क्रिकेट सामन्याचे उद्‌घाटन करण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना सुरेश नाईकवाडे म्हणाले की, स्नेह संमेलनामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मीक प्रेरणा निर्माण होते. या माध्यमातुन क्रिडा भावनीक सांघीक आणि नेतृत्वाची घडण होते. सांस्कृतीक कार्यक्रमातुन कला गुणांना वाव मिळतो त्यामुळे शालेय जीवनात स्नेह संमेलनाचे फार महत्व आहे .

स्नेह संमलनातुन विद्यार्थ्याची सर्वागीन बाजु जगापुढे येते असे ते या वेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन एम.ए.काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश टोपे यांनी केले. तुकाराम बोबडे जावळे भागवत, रामप्रसाद चव्हाण मो.अथर अन्सारी, निर्वळ एम.बी.सोनवणे, व्हि.एन.शिंदे, एस.एम.गारकर, एस.टी.गडदे, एम.जे.सोनटक्के, वाय .जे जावळे, बळीराम, आनंत खोगरके, वाव्हळे किशन, काळदाते महेश, भरेासे एस.व्ही.वायघुडगे, सुभाष, राजु पारडे, सौ.कविता गायकवाड, सौ.संगिता रेंगे कैलास बेले, वसंत लंगोेटे, जावळे बळिराम, श्रावणे पी.एस काळे, एम.व्ही.आदी परिश्रम घेत आहेत.

उदया गोल्डन बिट संगीत रजनीचे आयोजन 

उदया दिं 18 जानेवारी रोजी स्नेह संम्मेलनाअंतर्गत आनंद नगरीचे आयेाजन करण्यात आले त्या नंतर सकाळी 11.30 वाजता नांदेड येथील गोल्डन बिट या गायक अमजद खान व संच यांचा संगीत रंजनी कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले. आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.सुरेश नाईकवाडे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा यांनी केले आहे.

via Blogger http://ift.tt/2jjWRu0




from WordPress http://ift.tt/2jv0Ciz
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.