Latest News

आयुक्त आणि महापौरांनी दोन तास नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या

मोईन खान / परभणी /-

 परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीने महापौर सौ. संगीताताई वडकर, आयुक्त राहुल रेखावार यांनी दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठ गेट रोड अक्षदा मंगल कार्यालयाच्या बाजूस नागरीकांशी संवाद साधला. यावेळी नागरीकांनी आमच्या परिसरात पाईप लाईन, नाली, रोड करण्यात यावा या विषयावर आयुक्त राहुल रेखावार यांनी युआयडीसी अंतर्गत पाईप लाईन अंथरण्याचे काम चालु आहे. आपल्या परिसरात येत्या दोन महिन्यांमध्ये पाईप लाईन अंथरण्याचे काम पुर्ण होईल. विद्यापीठ रोड, अक्षदा मंगल कार्यालयासमोरचे उर्वरीत रोडचे काम मार्च एंड पर्यंत रोडचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही दिली. यावेळी महापौर सौ. संगीता वडकर यांनी नागरीकांना व महिलांना आपल्या परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. आपल्या मुलभूत सुविधा आम्ही लवकरच सोडवू. यानंतर रामकृष्ण नगर या परिसरात नालीच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी नगरसेविका सौ. अश्‍विनीताई वाकोडकर, राजेंद्र वडकर, प्रमोद वाकोडकर यांनी नागरीकांची भेट घेवून पाईप लाईन अंथरण्याचे काम चालू आहे. पाईप जोडल्यानंतर नागरीकांना पाणी मिळेल अशा व्यथा मांडल्या. महापौर व आयुक्त यांनी लवकरच पाईप लाईने काम दोन ते तीन दिवसात सुरू करू असे सांगितले. या परिसरात वृक्ष लागवड करण्याचे नगरसेविका सौ. अश्‍विनी वाकोडकर यांनी सांगितले. तसेच नृसिंह नगर या परिसरात नागरीकांची भेट घेतली. या परिसरात रोड आणि नाली नाही अशा समस्या मांडल्या. महापौर, आयुक्त, नगरसेविका सौ. मीराताई वसंत शिंदे, वसंत शिंदे व नागरीक यांनी व्यथा मांडल्या. आमच्या प्रभागामध्ये नाली, रोड करून देण्यात यावेत. या विषयावर आयुक्त रेखावार यांनी या संदर्भात नागरीकांना गावठाण परिसर आहे. गावठाण परिसराचे रूपांतर एनए करून घेवून घरपट्टी भरून घ्यावी. तसेच नागरीकांनी परभणी शहर स्वच्छ २०१७ सर्व्हेक्षणामध्ये आपला परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. कचरा घंटागाडीत किंवा कुंडीत टाकावा. यावेळी नागरीकांनी आपण दिलेला शब्द पाळण्यात येईल अशी ग्वाही. दिली. खानापूर परिसरात मध्ये आयुक्त राहुल रेखावार, महापौर वडकर, सौ. मीराताई शिंदे यांनी ङ्गेरङ्गटका मारला. या परिसरात सार्वजनिक वाचनालयाची मागणी केली. रोड व नाली करून देण्याची मागणी आयुक्त व महापौर यांच्याकडे करण्यात आली. नागरीकांनी आयुक्तांकडे गेल्या २५ वर्षापासून खानापूर हे गाव नगरपालिकेत रूपांतरीत झाले आहे. आजरोजी महापालिका झाली आहे. तरीही अद्याप या परिसरात विकास झालेला नाही. त्या विकासासाठी निधी द्यावा अशी मागणी केली. यावेळी महापौर यांनी या प्रभागात विशेष बाब म्हणून निधी देण्याचे प्रयत्न करू असे सांगितले. यानंतर सिद्धीविनायक नगर, विक्रम सोसायटी, आरोग्य कॉलनी या परिसरात मुलभूत सुविधा देण्याची मागणी केली. नागरीकांनी रोड, नाली, लाईट व नवीन खंबे बसवून देण्याची मागणी केली. आयुक्त राहुल रेखावार यांनी सर्व ठिकाणी पाहणी केली. यांच्यासोबत महापौर सौ. संगीताताई वडकर, मीराताई शिंदे, वसंत शिंदे व नागरीक यांनी या परिसरात पाहणी केली. यावेळी उजवणकर, काळे, काळे सर, रवि जाधव आदी नागरीक उपस्थित होते. नागरीकांनी या परिसरात गेल्या पाच वर्षापासून विकास झाला नाही. विकासाची गंगा आपल्या दारी यावी. आपण या परिसरात आल्याबद्दल नागरीकांच्यावतीने आपले स्वागत करण्यात येते. आपण पाईप लाईन, रोड, नाली देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी महापौर, आयुक्त यांनी येत्या मार्चच्या आत या परिसरात निधी देवून रोड व नाली करण्यात यईल अशी ग्वाही दिली. या नंतर या परिसरातील प्रगती नगर, मातोश्री नगर या परिसरात पाहणी केली. यावेळी नागरीकांनी मनपा अंतर्गत सुविधा मिळत नाहीत. आम्हाला लाईट लावून देण्यात यावेत. गेल्या सहा ते एक वर्षापासून बंद आहेत. या परिसरात पावसाळ्यामध्ये सायकल घेवून मुलांना शाळेत जाता येत नाही. रूग्ण घरी असल्यास पावसाळ्यामध्ये ऍटो घरी येत नाहीत. या भागात नागरी सुविधा देण्याची मागणी नागरीकांनी केली. प्रथमच आयुक्त व महापौर आल्याबद्दल या परिसरातील नागरीकांनी आनंद व्यक्त केला. महापौरांनी आपल्या परिसरातील नागरीकांना सुविधा देण्यात येतील असे सांगितले. यासाठी आयुक्तांना इस्टीमेट तयार करून कामाला गती द्या, अशा सुचना दिल्या. 

via Blogger http://ift.tt/2iCAFtn




from WordPress http://ift.tt/2iCAvSE
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.