Latest News

गायक चंद्रकांत शिंदे यांच्या बुध्द-भिम गिताने प्रेक्षकांना रिझविले – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनी शहिदांना श्रध्दांजली

उद्योगपती गुणवंत देवपारे यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /- 

नामविस्तार उत्सव समिती, चांदूर रेल्वे च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचे बुध्द-भिम गितांचा भव्य समाज प्रबोधनपर कार्यक्रम स्थानिक जि.प.हायस्कूलच्या प्रांगणावर घेण्यात आला. यामधे चंद्रकांत शिंदे यांनी सुंदर असे बुध्द-भिम गीते सादर करून समाज प्रबोधन केले.
या कार्यक्रमात प्रसिध्द गायक चंद्रकांत शिंदे व चमू यांनी ‘श्री बुध्दाच्या चरणावरती विजयादशमी दिनी, दीक्षा आम्हा दिली भिमानं, मंगल दिन तो जगी. गणती माझी गुलामात होती, जिंदगीच माझी सलामत होती, तोडली माझी गुलामाची बेडी, अशी झुंजणार तुझी जात होती. माझ्या भिमाच्या नावाचं व कुंकू  लावीले रमानं. कायदा भिमाचा अन फोटो गांधीचा शोभुन दिसतो का नोटावर, किती शोभला असता भिमा नोटावर टाय आणि कोटावर ‘ असे एकाहून एक असे बहारदार बुध्द आणि भिम गिते सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिध्द उद्योगपती गुणवंत देवपारे यांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदूर रेल्वे नाम विस्तार उत्सव समितीचे अध्यक्ष नानासाहेब डोंगरे, प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द गायक चंद्रकांत शिंदे, निर्मलाताई श्रीकृष्ण उबाळे, जयहिंद क्रीडा मंडळ अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, प्रा.भगवान इंगळे, जोरावर खॉ पठाण, महादेव दुर्याेधन, अशोक मोहोड, हेंमत हटवार, रत्नकलाबाई खडसे उपस्थित होते. अनिल आठवले, पत्रकार युसूफ खान, बाळासाहेब सोरगीवकर, प्रशांत कांबळे, लता बागडे आदीची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नामांतर लढ्यातील शहिदांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. तसेच चांदूर रेल्वे येथील आंबेडकरी कार्यकर्ते श्रीकृष्ण उबाळे, विठ्ठलराव बनसोड, श्रीधर गजभिये, सिताराम मेश्राम यांना मौन श्रध्दांजली वाहण्यात आली. समता सैनिक दलाने शहिदांना सलामी दिली. या प्रसंगी गुणवंत देवपारे, नानासाहेब डोंगरे यांनी आपले विचार व्यक्त केले. बिपीन लांडगे यांच्या बिपीन डॉन्स अकॅडमीच्या चिमुकल्यांनी सुंदर समुह नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे संचालन प्रेमचंद अंबादे, प्रास्ताविक निरंजन गोसावी व आभार प्रा.रवींद्र मेंढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार उत्सव समिती,चांदूर रेल्वेचे सर्व सदस्य व कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले.

via Blogger http://ift.tt/2j4y78l




from WordPress http://ift.tt/2iCIWgN
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.