Latest News

संत गजानन महाराज संस्थानमध्ये लक्ष्मी पूजन सोहळा

शेगाव (मनोज वर्मा सह महेद्र मिश्रा ).    
श्री गजानन महाराज संस्थानमध्ये ३0 रोजी लक्ष्मी पूजनाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने यावर्षीही उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. संध्याकाळी झालेल्या या सोहळ्याप्रसंगी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्यासह इतर विश्‍वस्त व भाविकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
दिवाळीनिमित्त श्रींच्या मंदिरावर नयनरम्य व देदीप्यमान विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही आरास उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. मांगलिक वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने श्रींच्या मंदिरात दीपावलीच्या निमित्ताने संस्थानच्या कार्यालयात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी देवीची मुख्य पूजा कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विश्‍वस्त नीळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, चंदुलाल अग्रवाल, सदस्य अभियांत्रिकी महाविद्यालय शरद शिंदे, रामेश्‍वर काठोळे, भक्तगण आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी संस्थानमधील हत्तीण ‘लक्ष्मी’चे पूजन शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने पूजेचे दर्शन घेतले. संस्थानच्यावतीने प्रत्येक भक्तांना कुंकुमतिलक करण्यात आले. तसेच लाही मुरमुरे बत्ताशाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात संस्थानच्या वाहनांची रांगेत पूजा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे गावातील रहिवाशांनी श्रींच्या मंदिरात पूजेचे दर्शन रात्री उशिरापर्यंत घेतले. मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता.
मंदिर परिसरात व भक्तनिवास परिसरात केळीचे खांब व दीपमाळा आकर्षण ठरले.

via Blogger http://ift.tt/2fJKdWz




from WordPress http://ift.tt/2fi1Z2p
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.