Latest News

दर्पण दिनानिमित्त निशीकांत भालेराव यांचे व्याख्यान -रक्तदान शिबिराचे आयोजन

मोईन खान / परभणी  (प्रतिनिधी)-

 मराठी पत्रकारीतचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त उद्या शुक्रवार, ६ जानेवारी रोजी दर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. वसमत रोडवरील माने टॉवरच्या सभागृहात सकाळी १० ते १ या वेळेत होणा-या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार निशीकांत भालेराव यांचे व्याख्यान तसेच रक्तदान शिबिर देखील होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल पाटील हे राहतील.
बहुभाषीक पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम वसमत रोडवरील स्पंदन हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या माने टॉवर येथे होणार आहे. या कार्यक्रमात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात होणार आहे. त्यानंतर आमदार डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार निशीकांत भालेराव यांचे व्याख्यान होणार आहे. ते पत्रकारीता आणि सध्याची परिस्थिती यावर भाष्य करतील. तर दुस-या सत्रात पत्रकारांचा चिंतन मेळावा होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील पत्रकार आपले मनोगत आणि विचार मांडतील. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित रहावे. तसेच मोठ्या संख्येने रक्तदानही करावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. धनाजी चव्हाण व सचिव गिरीराज भगत आणि सर्व पदाधिकायांनी केले आहे.

via Blogger http://ift.tt/2ifepWU




from WordPress http://ift.tt/2iFhums
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.