अचलपूर शहर शिवसेना प्रमुख विनय चतूर यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान व्यायाम शाळा बैरागीपेंड सरमसपूरा येथे सामुहिक हनुमान चालीसा पठन व महाआरती करण्यात आली.
४ जानेवारी ला शहरातील सर्वांचे लाडके शिवसेना शहर प्रमुख व आरोग्य मित्र विनय चतुर यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला.वाढदिवसानिमित्त हनुमान व्यायाम शाळा बैरागीपेंड सरमसपूरा येथे व्यायाम शाळेचे सर्व विद्यार्थी व पदाधिकारी तसेच शहरातील गणमान्य नागरीक यांनी येथील हनुमान मंदिरात सामुहिक हनुमान चालीसा पठन केले व महाआरती करून विनय चतुर यांचा वाढदिवस साजरा केला.त्यांना विलास बेलसरे,सुधीर चुनारकर,अरूण घोटकर,मानीक देशपांडे,किशोर कासार,राजेश्वर गोतमारे,गोवर्धन मेहरे,व्यायाम शाळेचे अध्यक्ष मधुकर राउत,युवराज परीहार,धनजंय लव्हाळे,अजय भागवत,जेष्ठ नागरिक केशवराव काळे,गायछाप सोसायटीचे अध्यक्ष अशोक बेंडे,प्रमोद भोंडे,लाड व असंख्य चाहत्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
via Blogger http://ift.tt/2iM6dkA
from WordPress http://ift.tt/2hVaL3M
via IFTTT
No comments:
Post a Comment