चांदूर रेल्वे / शहेजाद खान /–
चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेयांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रेन्बो इंग्लिश स्कूल च्या चिमुकलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश देवळे, प्रमुख पाहूणे म्हणुन पर्यवेक्षिका भारती अवधुतकर, जेष्ठ शिक्षिका प्रतिभा ठाकरे, संगीता मालपे, कविता बोराळे, वैजयंती चर्जन, मयुरी तेलंगे, कांचन पवार उपस्थित होते. प्राचार्य देवळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी वैष्णवी कळमकर, वैष्णवी बाभुळकर, वैष्णवी करपते, साक्षी बकाले, साक्षी वानखडे, साक्षी सरोदे, कल्याणी पाचघरे, समिक्षा माने, चैताली ठाकरे, प्रतिक्षा डोंगरे, जान्हवी खवले, ऋतुजा धाडवे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाटिका सादर केली. तर अनेक विद्यार्थीनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सादर केले. यावेळी सानिका बकाले, अंजली बकाले, आचल तरारे, सोनाली बनसोड, साक्षी डोंगरे, धनश्री वानखडे, साक्षी चौधरी, नारायणी बकाले, आरती बाभुळकर, रसिका तायडे, साक्षी निर्वाणकर, प्रियंका मंगरे, अदिती तरारे, अंकिता ठोंबरे या विद्याथ्र्यांनी विचार व्यक्त केले. थर प्राचार्य सुरेश देवळे व जेष्ठ शिक्षिका प्रतिभा ठाकरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाखा खवले यांनी तर संचालन साक्षी केने व प्राजक्ता बकाले आणि आभार अंकिता पवार या विद्यार्थीनीने मानले.
via Blogger http://ift.tt/2iI6geD
from WordPress http://ift.tt/2hVeiyU
via IFTTT
No comments:
Post a Comment