Latest News

आमदार श्री बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयच्या चौकात कडाक्याचा थंडीत काढली रात्र

आमदार वीरेंद्र जगताप सहित यशोमती ठाकूर यांचा ही बच्चू कडू यांना पाठींबा 
नगरसेवक दिनेश भाऊ बूब यांचीही उपस्थिती 

आपल्या मागण्यांसाठी जनतेच्या सेवकाला अन्नत्याग कराव लागत – हीच खरी शोकांकिका 



अमरावती /-  

काल अमरावती येथे झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्त आमदार श्री बच्चू भाऊ कडू यांनी काल रात्री पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाण मांडलाय जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत इथून हटणार असा पवित्र त्यांनी घेतलाय.



कालची संपुर्ण रात्र जिल्हाधिकारी कार्यालय चौक, अमरावती येथिल रस्त्यावर गेली. सोबत प्रहारच्या असंख्य कार्यकर्त्याच्या भेटीगाठी, चर्चा, समोरील रणनिती यात रात्रिची वेळ व कडाक्याच्या थंडीची जाणीव सुध्दा झाली आमदार व कार्यकर्त्यांना झाली नाही. 

यावेळी बच्चू कडू यांनी म्हटले कि माझे कार्यकर्ते हिच माझी ताकद व मी कमवलेली संपत्ती आहे. पाठीमागे लाखो शेतकरी, मजुर, विधवा, अपंग याचा आशीर्वाद असल्यावर कसलीही भिती नाही. प्रशासनास व सरकारला या भ्याड हल्याचा जवाब द्यावाच लागेल. असे ते म्हणाले यावेळी आमदार वीरेंद्र जगताप सहित यशोमती ठाकूर यांचा ही बच्चू कडू यांना पाठींबा जाहीर झाला आहे 
#प्रहार #नांगर_आंदोलन

via Blogger http://ift.tt/2iHkqil




from WordPress http://ift.tt/2hYq0fe
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.