Latest News

दोन युवकांना लोखंडी रॉडने जबर मारहाण परभणीतील घटना ; पाच आरोपींविरुध्द गुन्हा दाखल

मोईन खान / परभणी : –

आमच्या कॉलनी सायरन वाजवत का फिरता ? अशी विचारणा करून दोन युवकांना लोखंडी रॉडने जबर मारहाण झाल्याची घटना 4 जानेवारी रोजी सकाळी 11.20 वा. शहरातील देशमुख हॉटेल परिसरात घडली. यात एकाचे डोके फुटून  हातही फॅक्‍चर झाला आहे. या प्रकरणात पोलीसांना पाच आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

परभणीतील यशोधन नगरात राहणारा मंगेश जगन्नाथराव बोरकर (21 वर्ष) हा देशमुख हॉटेल परिसरात मित्रासोबत उभा असताना चार ते पाच जण त्या ठिकाणी आले. आमच्या गल्लीत सायरन वाजवत का फिरतो? असे म्हणून त्यांनी मंगेश बोरकर याला लोखंडी रॉडने डोक्यात व हातावर मारहाण केली. यामध्ये त्याचे डोके फुटून हात फॅ्रक्‍चर झाला. यावेळी त्याच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली, या आशयाची फिर्याद मंगेश बोरकर याने बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता पोलिसात दिली. त्यावरून आरोपी अर्जुन डिगुळे , निखील शिंदे, आयुष सोमानी,पिंटू डिगुळे, सोनु पवार यांच्याविरुध्द नवा मोंढा पोलीस ठाण्यात कलम 324 , 326, 143, 144 ,147,148 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार देशमुख करीत आहे.

via Blogger http://ift.tt/2iFjTxk




from WordPress http://ift.tt/2hUXW9z
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.