Latest News

निवासी वसतिगृहातील शाळकरी मुलगा बेपत्ता  परभणीच्या नवा मोंढा ठाण्यात अपहरणाची तक्रार

मोईन खान


 परभणी : –

शहरातील येलदरकर कॉलनीमध्ये ज्ञानसागर गुरुकुल निवासी वसतिगृहात राहत असलेला 15 वर्षीय विकास सोनाजी भुमरे हा विद्यार्थी 3 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजल्यापासून बेपत्ता आहे. याबाबत त्याच्या वडिलाने नवा मोंढा पोलीस ठाण्यात अपरहरणाची तक्रार दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बीड जिल्हयातील मोगरा शिवाजी नगर (ता.माजलगाव) येथील सोनाजी किशन भुमरे यांचा मुलगा विकास (15 वर्ष) हा परभणीतील कृषि सारथी कॉलनीमध्ये असलेल्या गांधी विद्यालयात शिक्षण घेत आहे. तो येलदरकर कॉलनीतील रामेश्‍वर आवरगंड यांच्या ज्ञानसागर गुरुकुल निवासी वसतिगृहात राहत होता. 3 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वा. तो  नेहमीप्रमाणे शाळेत गेला. मात्र त्या दिवशी रात्री उशीरापर्यंत तो  वसतिगृहात परत आला नाही. वसतिगृह चालकाने याबाबत त्याच्या कुटुंबियांना फोनवरून कळविले . त्यांनी आपल्या नातेवाईक व पाहुण्यांकडे विचारपुस करून विकासचा शोध घेतला. तरीही तो न सापडल्याने अखेर 4 जानेवारी रोजी सोनाजी भुमरे यांनी नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली . त्यात म्हणटले आहे की अज्ञात व्यक्तीने त्यांच्या  मुलाचे अपरहरण केले असावे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बी.आर. गिते करीत आहे.

via Blogger http://ift.tt/2hV4A4B




from WordPress http://ift.tt/2iFh7bx
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.