राष्ट्रमाता, राजमाता मॉ जिजाऊ साहेबांच्या जयंती निमित्त जिजाऊ जयंती महोत्सव समिती च्या वतीने वक्त्तृ स्पर्धा, निबंध स्पर्धा व जिजाऊ पुरस्काराचे वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
निबंधस्पर्धा ही सर्वासाठी खुली असुन त्यासाठी विषय एक राजाचीच नव्हे तर रयतेची माता मॉ जिजाऊ हा असणार आहे. त्याच बरोबर दि. 14 जानेवारी रोजी माध्यमिक गटासाठी विभागीय वक्त्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वक्तृत्व स्पर्धेसाठी स्वराज्य उभारणीत मॉ जिजाऊचे योगदान हा विषय ठेवण्यात आला आहे. ही स्पर्धा दक्षिणमुखी हनुमान मंदिर यलदरकर कॉलणी परभणी येथे होणार आहे. या दोन्ही स्पर्धासाठी प्रथम क्रमांक 2000/-रूपये, द्वितीय क्रमांक 1500/- रूपये, व तृतीय क्रमाक 1000/- रूपये आणि उत्तेजनार्थ दोन स्पर्धाकांना योग्य ते बक्षिस देण्यात येईल. आणि सर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र बक्षिसांचे वितरण हे जयंतीच्या मुख्य कार्यक्रमात दि. 15जानेवारी 2017 रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. निबंध लेखनाच्या स्पर्धकांनी आपले निबंध जिजाऊ जयंती महोत्सव समिती कार्यालय भालेराव कॉम्लेक्स, वसमत रोड या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा पोष्टाने दि.13 जानेवारी पर्यंत पाठवावे. आधिक माहितीसाठी संपर्कः 9890513329,7788081391,9850646785,7588571622. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या संधिचा लाभ घ्यावा असे आवाहन जिजाऊ जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
via Blogger http://ift.tt/2hUXixz
from WordPress http://ift.tt/2hURMGu
via IFTTT
No comments:
Post a Comment