परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकी साठी कॉंग्रेस पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १० जानेवारी २०१७ रोजी घेण्यात येणार आहेत. या वेळी कॉंग्रेस नेते
श्री केशवरावजी औताडे , माजी आ. हनुमंत पाटील बेटमोगरेकर,माजी मंत्री बसवराज पाटील , माजी मंत्री अब्दुल सत्तार , समशेर सिंग सोधी,माजी मंत्री तथा जिल्हा अध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ.सुरेश देशमुख, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, माजी खा. तुकारामजी रेंगे पाटील व इतर कॉंग्रेस पदाधिकार्यांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार आहेत.
तरी जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी दिनांक १० जानेवारी २०१७ रोजी सकाळी ११ वाजता , शनिवार बाजार स्थित राजीव भवन जिल्हा कॉंग्रेस कमिटी परभणी कार्यालयात मुलाखती साठी उपस्थित राहावे .
कॉंग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुकांचे आवेदन पत्र भरून घेणार असून दिनांक 5 जानेवारी पासून आवेदन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे, तरी इच्छुकांनी राजीव भवन कॉंग्रेस कमिटी शनिवार बाजार परभणी येथे येऊन सकाळी १० ते ५ या वेळेत उमेदवारी इच्छुक आवेदन पत्र दाखल करावेत.
via Blogger http://ift.tt/2i06Y8D
from WordPress http://ift.tt/2iJiy8D
via IFTTT
No comments:
Post a Comment