Latest News

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात बैठकीत सूचना

 परभणी : मोईन खान /–

भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी परभणी जिल्ह्यात एकूण 4 हजार 410 मतदार आहेत. त्यापैकी पुरूष 3 हजार 738, महिला मतदार 672 आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 16 मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दिनांक 4 जानेवारीपासून लागू झाली आहे. आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने दिनांक 5 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संबंधीत विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याकडे सर्व अधिकार्‍यांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महिवाल यांनी दिले. त्यानुसार  10 जानेवारी रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करणे. 17 जानेवारी रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहील. दिनांक 18 जानेवारी रोजी नामनिर्देशन अर्जाची छाननी होईल. 20 जानेवारी रोजी नामनिर्देशन मागे घेण्याचा शेवटचा दिवस राहील.  दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. 6 फेब्रुवारी मतमोजणी होऊन 9 फेब्रुवारी रोजी निकलानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

via Blogger http://ift.tt/2iLH8ne




from WordPress http://ift.tt/2hYdEk6
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.