Latest News

वनामकृवितर्फे औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन – जागतिक वातावरण बदल : शेती व जलक्षेत्रावर होणारे परिणाम या विषयावर होणार

परभणी / प्रतिनिधी /-

औरंगाबाद येथे 14 ते 16 डिसेंबरदरम्यान जागतिक वातावरण बदल : शेती व जलक्षेत्रावर होणारे परिणाम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

                 महाराष्ट्रातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्था आणि पुणे येथील कृषि संशोधन व तंत्रज्ञान नियतकालिक यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये वातावरण बदल व परिवर्तनशिलता व प्रक्रिया, शेतीवरील परिणाम, हवामान बदलास जुळवून घेण्याची प्रक्रिया, हवामान बदलाची तीव्रता कमी करणे, हवामान बदल व जलसाठे, वातावरण बदल व वारंवारता, आपत्ती व्यवस्थापन, पावसातील खंड,  हवामान बदलानुसार शेती, हवामान बदलाच्या पार्श्वभुमीवर अल्पभुधारक शेतकरी सक्षम होणे, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट या विषयावर विचारमंथन होणार आहे. महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ याबरोबरच युरोपातील अनेक राष्ट्रांमधून या समस्या अलीकडच्या काळात वारंवार अनुभवास येत असल्याने त्यांचा कृषी उत्पादनावर व जलसाठ्यांवर अनिष्ट परिणाम होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर सदरिल परिसंवादाचे औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले असून मुख्य आयोजक परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. सदरील आंतरराष्ट्रीय परिसंवादास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक तथा प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मभुषण डॉ. राजेंद्रसिंह परोडा, हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय कोरडवाडू संस्थेचे (इक्रिसॅट) महासंचालक मा. डॉ. डेव्हीड बर्गव्हिन्सन, पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाघ्यक्ष  डॉ. राम खर्चे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिसंवादाच्या आयोजन समितीमध्ये वनामकृविचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरूलू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. आर. जी. दाणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. तपस भट्टाचार्या, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ यांचा समावेश आहे. सल्लागार समितीमध्ये श्रीलंका, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथील प्रख्यात शास्त्रज्ञ व देशातील विविध कृषि विद्यापीठांचे कुलगुरूंचा समावेश आहे. परिसंवादामध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, विद्यार्थी, अशासकीय संस्था तसेच प्रगतशील शेतकरी सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे व्यवस्थापन करण्यासाठी सल्लागार व आयोजन समितीचे गठण करण्यात आले असून परिवसंवादासंबंधी संपुर्ण माहिती संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचे वनामकृविचे संशोधन संचालक तथा मुख्य आयोजक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सांगितले.

via Blogger http://ift.tt/2hYg6Hh




from WordPress http://ift.tt/2iJcL2V
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.