जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दि ६ जानेवारी रोजी मोदी सरकार विरोधात डफळे बजाओ आंदोलन करण्यात आले .
या प्रसंगी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर करून जनतेवर अन्याय केला आहे त्या मुळे सर्व सामान्य व गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे शेतमालाचे भाव कोसळले असून शेतकरी लुबाडला जात आहे नोटबंदीच्या काळात १५० पेक्षा जास्त लोकांचा बँकेच्या रांगेत मृत्यू झाला असून शेतकरी लुबाडल्या जात आहे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी नोटा छापण्यासाठी ८ महिन्याचा कालावधी आर बी आय ला लागतो मग पंतप्रधान यांनी फक्त ५० दिवसाची मुदत देऊन जनतेची दिशाभूल केली म्हणून पंतप्रधान यांनी जनतेची माफी मागावी या निर्णयामुळे अनेक लघुउधोग बंद पडले असून बोरोजगारी चे प्रमाण वाढले आहे अश्या सर्वाना शासनाने बोरोजगार भत्ता द्यावा .
महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकज्या मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या पकडण्यात आलेल्या कोट्यवधी उपायांची चौकशी व्हावी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या बँकेच्या खात्या मध्ये ५०० कोटी रुपये जमा झाले असून याची सखोल चौकशी व्हावी , शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी संजय गांधी निराधार लाभार्ध्यांना प्रति महिना १००० मिळावे इत्यादी सह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या या वेळी पक्ष नेते रामविजय बुरुंगले, डॉ स्वाती वाकेकर, प्रकाश पाटील ,राजू पाटील, खलील देशमुख , ऍड ज्योती ताई ढोकणे, रंगराव देशमुख, युनूस खान, यांचे सह असंख्य पदाधिकारी व कार्यकतें उपस्थित होते
via Blogger http://ift.tt/2j1POpC
from WordPress http://ift.tt/2i1BE5S
via IFTTT
No comments:
Post a Comment