चांदुर रेल्वे- /शहेजाद खान /-
दिनांक ६ जानेवारी १८३२ साली जेष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजाच्या जडणघडणीसाठी तसेच समाज प्रबोधन करण्यासाठी दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र चालू केले. महाविद्यालयात शिक्षण देताना त्यांना भारताचे पारतंत्र्य तसेच नागरिकांच्या समस्या यांना वाचा फोडण्यासाठी वृत्तपत्राची आवश्यकता भासू लागली. म्हणून त्यांनी त्यांच्या खऱ्या अर्थाने सामाजिक लढाईला सुरुवात केली.
६ जानेवारी हा जांभेकर यांचा जन्मदिवस असल्याने दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. विविध प्रश्नावर लेखणीद्वारे आवाज उठवणे, सामाजिक कार्याला प्रसिद्धी देऊन योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात. जनतेचा आणि लोकशाहीमधील
दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जात आहे. याच अनुशंगाने स्थानिक विश्रामगृहात पत्रकारदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरातील जेष्ठ पत्रकार उत्तमराव गावंडे हे होते. यावेळी उपस्थित काही पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच तळेगाव दशासर येथील जेष्ठ पत्रकार वसंतराव कुळकर्णी व नवनिर्वाचित नगरसेवक पत्रकार संजय मोटवानी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी शहरातील पत्रकार युसुफ खान, प्रा. रविंद्र मेंढे, अमोल गवळी, प्रविण शर्मा, बाळासाहेब सोरगिवकर, प्रशांत कांबळे, धिरज नेवारे, सुधिर तायडे, मनिष खुने, राहुल देशमुख, मंगेश बोबडे, मधुकर बावने, विवेक राऊत आदींसह तालुक्यातील पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते..
via Blogger http://ift.tt/2iT0hWT
from WordPress http://ift.tt/2iMPqO1
via IFTTT
No comments:
Post a Comment