अनिल चौधरी
पुणे :-
कोंढवा :- काकडे वस्ती गल्ली नं.३ मध्ये पिण्याच्या पाईप मध्ये लीकीज ड्रेनेजचे पाणी जावून पाण्याला दुर्घंदी येत असल्याने दुषित पाणी पिण्याने रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा दुषित पाणी नळाला येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कोंढवा बुद्रुकच्या काकडे वस्ती गल्ली नं.३ परिसरात गेल्या अनेक दिवसापासून दुर्घंदीयुक्त पाणी पुरवठा होत आहे. एकाच रस्त्यावर असलेल्या ड्रेनेज लाईन आणि पाण्याचे नळ लाईन या दोन्ही पाईप ला गळती सुरु असल्याने दुषित पाणी नळच्या पाईप मध्ये शिरून पिण्याच्या पाण्यास दुर्घंदी येत आहे.
यासंदर्भात वारंवार नागरिकाकडून तक्रारी केल्या गेल्या आहेत. परंतु याकडे कोणी लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास रोगराई होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे स्वप्नील शेलार व सुरेश कवडे यांनी हि बाब प्रत्यक्ष घटना स्थळी जावून महानगर पालिकेचे कर्मचारी यांच्या लक्षात आणून दिली. अभियंता बारवकर यांनी फुटलेल्या ड्रेनेजमधून बाहेर पडणारे दुषित पाणी तात्पुरते बंद करून घेतले. यावेळी येथील संतोष कांबळे. महादेव वाघ.रमेश कदम यांनी मदत केली.
पालिकेचे कर्मचारी बारवकर म्हणाले नळाची लाईन आणि देनेज अनेक वर्षापासुनचे जुने आहेत. ड्रेनेजचे पाणी झिरपून कुजलेल्या नळाच्या पाईप मध्ये जावून पाण्याला दुर्घंदी येत असावी असे सांगितले.
via Blogger http://ift.tt/2i0CN2r
from WordPress http://ift.tt/2inTxNp
via IFTTT
No comments:
Post a Comment