Latest News

हागणदारीत पेटविल्या शेकोट्या गावाच्या स्वच्छतेसाठी सरसावले – स्वच्छाग्रही शौचालय बांधणार्‍या कुटुंबाचा दाभडीत सत्कार



वाशिम /–

आपल्या गावाला स्वच्छ व सुंदर बनवाण्यासाठी मंरुळपीर तालुक्यातील दाभडी गावाला चारही बाजुने वेढणार्‍या हागणदारीत शेकोट्या पेटवुन स्वच्छताग्रहींनी भल्या पहाटे पहारा दिला. उघड्यावर शौचास जाणार्‍यांची एक प्रकारे कोंडी केल्याने शेकोटीच्या जागृतीची ही आग आता गावभर पसरली आहे.

या गावाने स्वच्छतेच्या कामात आघाडी घेत  एकाच वेळी तब्बल 100 शौचालय बांधकामांना सुरुवात झाली आहे. दरम्यान येणार्‍या 26 जानेवारीला गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार गावातील एका कार्यक्रमात गावकर्‍यांनी केला आहे.


 ग्रामसेवकाचा गावात सलग 15 दिवस मुक्काम

ग्रामसेवक देवा राठोड यांनी दाभडी गाव हागणदारीमुक्त  करण्याचा विडा उचलला आहे. लोकांनी शौचालय बांधुन त्याचा वापर करावा यासाठी त्यांनी गावातच तळ ठोकला. सलग 15 दिवस मुक्काम करुन त्यांनी सकाळी 4 वाजता हागणदारीत शेकोट्या पेटवुन लोकांना उघड्यावर शौच करण्यापासुन परावृत्त केले.
त्यांच्या या प्रयत्नाला प्रतिसाद देत आता गावात 30 ते 35 स्वच्छाग्रही लोक तयार झाले आहेत. कडाक्याच्या थंडीत ते सकाळी 4 वाजता उठुन एकत्र जमतात. चार गट करुन गावाच्या चारही बाजुने वेढलेल्या हागणदारीत शेकोटी पेटवतात. जे लोक शौचाला बाहेर येतात त्यांना उघड्यावर जाण्यापासुन परावृत्त करतात. शिट्टी वाजवुन लोकांना जागृत करतात. त्यांचा डब्बा (टमरेल) घेतात. त्यांना शौचालय बांधण्याचा आग्रह धरतात. त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करतात.

गावातील स्वच्छाग्रही झाले व्लिलेज चँपिअन

दाभडी गाव स्वच्छ करण्याच्या या कामात गावातील स्वच्छाग्रही (व्हिलेज चँपिअन)  सरपंच जयश्री महल्ले, ग्रामसेवक नंदकिशोर महल्ले, उप सरपंच विठ्ठल पवार, सुधाकर महल्ले, अण्णा महल्ले, ग्रा.पं. सदस्य ज्ञानबा भगत, कमलबाई नांदे, सरस्वतीबाई महल्ले यांच्यासह गावकर्‍यांचीही साथ लाभत आहे.  या गावातील रहिवासी असलेल्या माजी पंचायत समिती सभापती प्रतिभा महाले या वेळोवेळी गावकर्‍यांना या कामासाठी प्रेरीत करतात.

स्वच्छाग्रहींचा सन्मान

गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार्‍या 30 स्वच्छाग्रहींचा आणि शौचालयाचे खड्डे खोदुन बांधकाम सुरु करणार्‍या सुमारे 100 कुटुंप्रमुखांचा पुष्पहार व बुके देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी सभापती प्रतिभा महल्ले, जि. प. चे माहिती व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भिकाजी पद्मने यांची यावेळी  विशेष उपस्थिती होती.

via Blogger http://ift.tt/2io0hLl




from WordPress http://ift.tt/2jnxgnd
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.