यवतमाळ : –
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतून जिल्ह्यात 100 टक्के अनुदानावर सामुहिक शेततळे उभारण्यात येत आहे. यात खोदकाम झालेल्या शेततळ्यांच्या प्लॅस्टिक फिल्म अस्तरीणासाठी एकूण खर्चाच्या 50 किंवा कमाल 75 हजार रूपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
शेततळ्यांसाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागांच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून पुर्व संमतीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करण्यात यावी. हे शेततळे 2 हजार घन मिटर ते 10 हजार घनमिटर पर्यंत उभारणी करता येईल. मंजुर आकारमानानुसार 50 टक्के फळपिकाची लागवड असणे बंधनकारक राहिल. 50 टक्के इतर फलोत्पादन पिके असल्यास असेच शेतकरी सदर घटकासाठी पात्र राहून मंजुरी देण्यात येईल.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी 2015-16 आणि 2016-17 या वर्षात एमआरइजीएस आणि आरकेव्हीवाय, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, गळीत धान्य अभियान तसेच स्व:खर्चाने खोदकाम केलेले शेततळे यासारख्या व इतर योजनेंतर्गत खोदकाम पुर्ण झालेल्या तथापि फक्त फळबाग, भाजीपाला, फुले आणि औषधी वनस्पती आदी क्षेत्राशी निगडीत असेल तेवढाच क्षेत्रासाठी उपयोगात असलेल्या शेततळ्यांच्या प्लॉस्टिक फिल्म अस्तरीणासाठीच एकूण खर्चाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 75 हजार रूपये लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे
via Blogger http://ift.tt/2i0I1vf
from WordPress http://ift.tt/2inQzZq
via IFTTT
No comments:
Post a Comment