परभणीतील कमलताई जामकार यांच्या स्मृति निमीत्त देण्यात येणारा दर्पण पुरस्कार नेपाळच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सामाजिक कार्यकर्त्याअनुराधा कोईराला यांना जाहीर करण्यात आला आहे.
महिलांच्या क्षेत्रात काम करणार्या समाजसेवीकेस दरवर्षी 6 जानेवारीला दर्पण पुरस्कार घोषीत करण्यात येतो. पुरस्काराचे हे 17 वे वर्ष असून या पुर्वी हा पुरस्कार रेखा बैजल, डॉ. वृषाली किन्हाळकर, मेबल आरोळे, सिंधुताई सपकाळ, राणी बंग, डॉ. हेमलता पाटील, डॉ. सुरेखा दळवी, नसीमा हुरजूक,वैशाली पाटील, प्रतिभा शिंदे, साधना झाडबुके, डॉ. मंदा आमटे, मायाताई चोरटे,रहेमतबी मिर्झा, उत्तर प्रदेशातील सुमनसिंह चौहान,सुलोचना कडू यांना प्रदान करण्यात आला.अनुराधा कोईराला मागील 23 वर्षापासून माईटी नेपाळ या संस्थेमार्फत मुली व स्त्रियांच्या देह विक्रीसाठी चालणार्या गैरमार्गाविरुध्द लढा देत असून त्यांच्या पुर्नवसनाचे कार्य करीत आहे.आतापर्यत त्यांनी 12 हजार मुली व स्त्रियांची देह विक्रयाच्या व्यवसायातून सुटका केली आहे. लवकरच एका समारंभात दर्पण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे
via Blogger http://ift.tt/2i04UNF
from WordPress http://ift.tt/2jiTB5a
via IFTTT
No comments:
Post a Comment