Latest News

नवोदय विद्यालय परिक्षेचे प्रवेशपत्र मिळाले नसल्याची तक्रार

परभणी / मोईन खान /- 

तालुक्यातील असोला येथील कै. गणपतराव रेंगे पाटील माध्यमीक विद्यालयातील पाचवीच्या दहा विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परिक्षेसाठी मुदतीमध्ये आवेदन पत्र भरलेले आहे. परंतूत्यांना अद्याप परिक्षेसाठी मिळणारे प्रवेशपत्र प्राप्त झाले नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

सदरील शाळेच्या वतीने 6 सप्टेंबर 2016 रोजी गट शिक्षणाधिकार्‍याकडे आवेदनपत्र दाखल करण्यात आले होते. मागील 15 दिवसापासून कार्यालयाकडे विचारणा सुरु आहे. परंतू गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सदरील 10 विद्यार्थ्याचे आवेदनपत्रच सादर केले गेलेले नाहीत, असे दिसून येत आहे त्यामुळे सदर विद्यार्थी परिक्षेपासून वंचीत राहण्याची भिती शिक्षक व पालकांनी व्यक्त केली आहे.

via Blogger http://ift.tt/2ijdlRY




from WordPress http://ift.tt/2ijrs9O
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.