जिल्ह्यात पंधरवाड्यापूर्वी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी आले तरीही अद्याप नऊ गावांत ते पोहोचलेले नाही. रब्बी हंगामातील पेरणीचा कालावधी संपला तरी पाण्याअभावी जमिनी काळ्या आहेत, तरीही पाणी सोडल्या जात नसल्याची तक्रार सोमवारी नऊ गावातील शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली.
जिल्ह्याला तीन वर्षानंतर जायकवाडीचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. यंदा 17 डिसेंबरला जिल्ह्यात आलेले पाणी पूर्णा तालुक्यातील नऊ गावांपर्यंत अद्याप पोहोचले नाही. रब्बी पेरणीबरोबर गहु आणि इतर पिकांच्या लागवडीचा कालावधी निघून गेला. आता पहिली पाणीपाळी संपण्याचा कालावधी चार दिवसांनतर आला. तरीही शेती कोरडी असल्याने शेतकरी वैतागले आहेत. सुरूवातीला तीन पाणी वापर संस्थाकडून रितसर पाण्याचा मागणी अर्जही केला. एकनाथ पाणीवापर व व्यवस्थापन सहकारी संस्था गणपूर पंचमुखी आणि त्रिमुर्ती संस्थेचा यात समावेश आहे. शिवाय ममदापूर, खांबेगाव, सुकी तसेच एकरूखा शाखेतील कान्हडखेड, हाटकरवाडी, फुकटगाव, कान्हेगावात पाणी गेलेले नाही. जवळपास 18 ते 26 पर्यतच्या वितरिकेमध्ये पाणी सोडले नाही. येथील हजारो हेक्टर शेती पाण्यापासून वंचित असल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ लागले. त्यासाठी शेतकर्यांनी निवेदने दिले तसेच जायकवाडी कार्यालयास कुलूप ठोकले. तरीही काहीच कार्यवाही न झाल्याने पुन्हा सोमवारी जिल्हाधिकार्यांकडे व्यथा मांडण्यात आली. पहिले पाणी आले नसताना रबीसाठी चार आणि उन्हाळी हंगामासाठी तीन पाणीपाळ्या मिळण्याची शाश्वती वाट नसल्याचे त्यांनी सांगितले. लवकर पाणी सोडण्याची मागणी खासदार संजय जाधव यांच्यासह शेतकर्यांनी केली, अन्यथा आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, काशीनाथ काळबांडे, गोपीनाथ अंभोरे, विठ्ठल सोनटक्के, सुरेश काळबांडे, मुंजाजी काळबांडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2iPKk44
from WordPress http://ift.tt/2jiPCWh
via IFTTT
No comments:
Post a Comment