Latest News

पत्रकारीतेचे मुल्य जपा – निशीकांत भालेराव – ‘बहुभाषिक’चा दर्पण दिन साजरा

परभणी / मोईन खान /– – 

तुमचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी तडजोडी जरूर करा. मात्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक यांच्या प्रमाणे पत्रकारीतेच्या मूल्यांची जपवणूक देखील केली पाहिजे, असे आवाहन जेष्ठ संपादक निशीकांत भालेराव यांनी केले. वसमत रोडवरील शिवछत्रपती सभागृहात बहुभाषिक पत्रकार संघाच्या दर्पण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल पाटील हे होते.

सदर कार्यक्रमात प्रारंभी बहुसंख्य पत्रकारांनी रक्तदान केले. पुढे बोलताना भालेराव यांनी मराठवाड्यातील निजामकालीन ते आजच्या पत्रकारीतेवर प्रकाश टाकला. पुर्वीची नियतकालीके ही एखाद्या ध्येय, उद्दीष्टाने चालत असत. मराठवाडा या प्रसिद्ध नियतकालीकाची वाटचाल त्यांनी सांगितली. १९६८ पर्यंत मराठवाडाने संयुक्त महाराष्ट्रासाठी व मराठवाड्यातील प्रश्‍न सोडवण्यासाठी आपली लेखनी झिजवली. त्यानंतर दैनिक झालेल्या या नियतकालीकाचा मात्र भांडवली वृत्तपत्रांपुढे टिकाव लागला नाही, असेही ते म्हणाले. सध्या भांडवलदार या क्षेत्रात उतरल्याने ते या माध्यमातून उत्पन्न काढण्याचे प्रयत्न करतात. मात्र त्यामुळे खरी पत्रकारीता करणार्‍यांना अडचणी येतात. त्यांच्यापुढे तडजोडी करूनच आपल्याला पत्रकारीता करावी लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सोबतच ते म्हणाले, उदरनिर्वाह चालविण्यासाठी अशा तडजोडी कराव्याच लागतात. मी देखील केली. मात्र त्यासोबतच बाळशास्त्री जांभेकर आणि लोकमान्य टिळकांप्रमाणे पत्रकारीतेचे मूल्य देखील जपायला पाहिजे, असे ते म्हणाले. यानंतर अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल पाटील म्हणाले, पत्रकारीतेतून होणार्‍या टिकांमुळे आम्हाला आमच्या चुका लक्षात येतात. राजकारणात अनेक तडजोडी कराव्या लागतात. परंतु त्या तडजोडी योग्य की अयोग्य हे वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यावरून आमच्या लक्षात येते. टिका व्हायलाच पाहिजे. आम्ही त्यांचा स्विकार करतो. त्यामुळेच आम्हाला योग्य दिशा मिळत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर डॉ. धनाजी चव्हाण, जेष्ठ पत्रकार दिलीप माने, सुरेश जंपनगिरे, अभिमन्यू कांबळे हे उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष डॉ. धनाजी चव्हाण यांनी तर मार्गदर्शक निशीकांत भालेराव यांचा परिचय गिरीराज भगत, सुत्रसंचालन गजानन देशमुख यांनी व शेवटी गिरीराज भगत यांनी आभार मानले. शेवटी राज्य ग्रंथ निवड समितीवर निवड झाल्याबद्दल सुरेश जंपनगिरे यांचा तर मुद्रा योजनेवर निवड झाल्याबद्दल डॉ. धनाजी चव्हाण व अधिस्वीकृती पत्र मिळाल्याबद्दल अनिल दाभाडकर, बंडू बनसोडे, विवेक मुंदडा, कपील कोठारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार हमीद मलिक, विनोद कापसीकर, मदन कोल्हे, विजय कुलकर्णी, विशाल माने, प्रभू दिपके, अनिल दाभाडकर, बंडू बनसोडे, विवेक मुंदडा, दिपक बोकन, प्रविण चौधरी, प्रसाद आर्वीकर, विठ्ठल वडकुते, मोईन खान, शेख इफ्तेखार, सुनिल चाटुङ्गळे, एकनाथ गोदम, रमेश नाटकर, मारोती जुमडे, सुमन उङ्गाडे, उषा वाव्हळे, प्रविण भानेगावकर, जालिंदर गिरी, नईम इनामदार, बाबासाहेब काळे, नंदु प्रभुने, अमोल अवचार, कपील कोठारी, चंद्रकांत भुजबळ, राजेश बालटकर, प्रमोद जाधव, रवी मानवतकर, उत्तम बोरसुरीकर, योगेश गौतम आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परभणी येथे दर्पण दिनानिमीत्त जिल्हा बहुभाषीक पत्रकार संघाच्यावतीने दर्पण दिना निमीत्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ.धनाजी चव्हाण, दिलीप माने, गजानन देशमुख,विनोद कापसीकर,अनील दाभाडकर,शिवराज भगत,मदन कोल्हे, लक्ष्मीकांत बनसोडे, नंदु प्रभूने , दिपक बोकन, रमेश नाटकर आदी.

via Blogger http://ift.tt/2hXvTLz




from WordPress http://ift.tt/2ijd01S
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.