सध्या गेल्या कांही वर्षात मराठवाडा आणि विदर्भात शेतकयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. केवळ २० ते ६० हजार रुपयांसाठी शेतकरी आत्महत्या करतात. पण या आत्महत्यांसोबतच शेतकऱ्यांचा यशोगाथाही आहेत. हे ही विसरून चालणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न निवडता शेतीकडे व्यवसाय म्हणून पहावे आणि आत्महत्येसोबतच यशोगाथांकडेही लक्ष देवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निशीकांत भालेराव यांनी परभणीतील गणेश वाचनालयात लोपामुद्रा पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
कै मुकुंदराव पेडगावकर स्मृतीप्रित्यर्थ शुक्रवार, ६ जानेवारी रोजी सायकाळी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान समारोहात ‘सकारात्मक शेती विचार’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लातूर येथील एड्सग्रस्तांसाठी काम करणारे सेवालय संस्थेचे रवी बापटले यांची उपस्थिती होती. दरम्यान, लोपामुद्रा पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. या वर्षीचा लोपामुद्रा पुरस्कार रवी बापटले यांना निशीकांत भालेराव यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना भालेराव म्हणाले, श्रमाचा जागर करुन शेतीचं गणित मांडायचे असते. समाजात शेतकऱ्यांचा आत्महत्या जश्या आहेत, तशा यशोगाथाही आहेत, हे सांगत त्यांनी खोपोली, नाशिक, ठाणे आणि विदर्भातील काही यशस्वी शेतकऱ्यांची उदाहरणेही दिली. दरम्यान, ज्या घरात शेतकऱ्यांची आत्महत्या होते, त्याचा मुलगाही पुढे शेतीच करणार असल्याचे ठासून सांगतो. हे चित्र आशावादी आहे. याउलट अनेक राजकीय पक्ष आणि नेते शेतकयांची पिळवणूक सांगतात, पण उपाय मात्र कोणीच सांगत नाही. शेतकयांना सकारात्मक विचारही सांगणे गरजेचे आहे. सध्या मराठवाड्याची भौगोलिक स्थिती वाईट आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांनी जास्त पाण्याची पीके घेवू नयेत. आपल्याकडे जमीनीची धूप सर्वात कमी झालेली आहे आणि कार्बनची स्थिती अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे पीके आणि कडधान्यांमध्ये घट झाली आहे. सध्या २००२ नंतर कडधान्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे शेतीकडे शेतकऱ्यांनी फक्त व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगीतले. यावेळी प्रदान करण्यात आलेल्या लोपामुद्रा पुरस्काराला उत्तर देताना रवी बापटले म्हणाले, सेवालय हे भूषण नाही. सेवालयामधून माणूस घडत नाही. त्यामुळे ते बंद पडावे. आज समाजातील १ टक्के लोक एड्सग्रस्त आहेत. म्हणजे, सुमारे ५० लाख मुले-मुली एड्सग्रस्त आहेत. परंतु, यामध्ये मला लागण झाली म्हणून इतरांनाही ती व्हावी, अशी विकृती जन्म घेते आहे. म्हणून या आजाराचा प्रसार होतो. सुरुवातीला गावातील एका एड्सबाधीत मुलाचा अंत्यविधी करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. तेव्हा पुढे होऊन आम्ही त्या मुलाचा अंत्यविधी केला. तेव्हापासून समाजातील एड्सग्रस्तांसाठीच काम करायचे ठरविले आणि ६५ मुलांना घेवून आज ही संस्था समाजातील दात्यांच्या मदतीने चालते आहे. समाजासाठी केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा पुरस्कार आहे, असेही त्यांनी सांगीतले. मानपत्राचे वाचन रमाकांत लिंबेकर यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले.
via Blogger http://ift.tt/2iNI8cW
from WordPress http://ift.tt/2inSrkz
via IFTTT
No comments:
Post a Comment