थोर नाटककार राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा ब्राह्मण युवक एकता मंचातर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
पुणे येथील छत्रपती संभाजी उद्यान मधील गडकरी यांच्या पुतळयाची काही विक्रूत इसमानी विटंबना केली व पुतळा नदीच्या पात्रात फेकून दिला. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला.
ब्राह्मण युवक एकता मंचा तर्फे लवकरात लवकर आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पुतळा पूर्ववत स्थापन करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मंचाचे प्रवक्ते पं. गजानन जी शर्मा, सुदेश पट्टलवार, अखिलेश जोशी, निखिल शर्मा, अनिकेत जोशी, प्रथमेश पाठक, ओंकार पितळे, सागर व्यास, रुशिकेश देशपांडे,अक्षय मिश्रा व समस्त ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2jbq4Gr
from WordPress http://ift.tt/2iPAOO4
via IFTTT
No comments:
Post a Comment