येथील संतोषी माता मंदिर परिसरातील रहिवाशी दामोधर तायडे यांचा मुलगा संतोष दामोधर तायडे (वय ३२) यांचे अपघाती मृत्यू झाला. २५ फेब्रुवारीला दुपारी ४.३० वा.यवतमाळ येथून पांढरकवडा जातांना तळेगाव जवळ ( जि.यवतमाळ) मोटर सायकल व ट्रॅव्हलच्या अपघातात त्याच्या जागीच मृत्यू झाला.
मृतक संतोष तायडे पांढरकवडा येथील एका नोकरीवर रुजू होण्यासाठी मोटरसायकलने निघाले होते. वाटेत तळेगाव जवळ ट्रॅव्हलने कट मारल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आईवडिल, पत्नी, आठ महिण्याच्या मुलगा व धाकटा भाऊ आहे. त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती जाण्यामूळे संतोषी माता मंदिर परिसरात शोककळा पसरली आहे.
via Blogger http://ift.tt/2mEud8x
from WordPress http://ift.tt/2msIzvO
via IFTTT
No comments:
Post a Comment