Latest News

सनातन संस्था पुणे या न्यासाच्या वतीने उरण येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

उरण – 
उरण वाणिज्य आणि कला महाविद्यालय, उरण-रायगड या महाविद्यालयाच्या वतीने घेतलेल्या एन्.एस्.एस्. कॅम्पमध्ये विशेष श्रमसंस्कार शिबीर या अंतर्गत व्यक्तिमत्त्व विकास आणि गुणसंवर्धन या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. सनातन संस्था पुणे या न्यासाच्या वतीने सौ. स्मिता नवलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी मनावरील वाईट संस्कार म्हणजे आळशीपणा, चालढकलपणा, अव्यवस्थितपणा या दोषांवर मात करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे, तसेच स्वावलंबनाचे महत्त्व यांविषयी मार्गदर्शन केले. ३० विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.
तसेच सुयश क्लासेस, आवरे, उरण येथेही स्वावलंबन, नियोजनकौशल्य यांचे महत्त्व सांगून आत्मविश्‍वासाने परीक्षेला सामोरे जाण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, याचेही मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा ५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

via Blogger http://ift.tt/2hZoNpF




from WordPress http://ift.tt/2iRTpJk
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.