Latest News

पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय सोनवनी, तर कवी संमेलनाचे अध्यक्ष शामसुंदर सोन्नर

सोलापूर (प्रतिनिधी) : –



पहिल्या अखिल भारतीय धनगर आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत, साहित्यीक संजय सोनवनी यांची एकमताने निवड करण्यात आली असून यावेळी होणाऱ्या कवी संमेलनाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध कवी, ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर भूषविणार आहेत, अशी माहिती संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. अभिमन्यू टकले यांनी दिली. हे साहित्य संमेलन 7 आणि 8 जानेवारी रोजी सोलापूर येथे संपन्न होत आहे.



साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यावेळी भव्य कवीसंमेलन होणार आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष स्थान हभप शामसुंदर सोन्नर हे भूषविणार आहेत. त्या कवीसंमेलनात गोविंद काळे,धनजंय सोलंकर,माधव गीर,अपर्णा पटणे,सौ रुपाली अवचरे,शिवाजी बंडगर,दत्ता सरगर,श्रीकृष्ण पडळकर,विमल माळी,श्री डोंगरे,मुकुंद वलेकर, डाॅ. देवराव चामणर इ.आपल्या कवितांचे वाचन करणार आहेत.

via Blogger http://ift.tt/2hYMZXX




from WordPress http://ift.tt/2iOB4gs
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.