मुळेगांव तांडा (जिल्हा सोलापूर) येथील अवैध पशूवधगृहाचे प्रकरण
| श्री. प्रवीण पोटे-पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अभय वर्तक आणि श्री. श्रीकांत पिसोळकर |
नागपूर– सोलापूर जिल्ह्यातील मुळेगांव तांडा या गावामध्ये गेली १० वर्षे शासनाचे अनेक नियम आणि कायदे धाब्यावर बसवून अन् शासनाची फसवणूक करून अवैधपणे चालू असलेल्या मे. सोनअंकुर एक्सपोर्ट्स प्रा.लि. या पशूवधगृहाची चौकशी करून कारवाई करा, असे आदेश पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे-पाटील यांनी १६ डिसेंबर या दिवशी दिले. हे अवैध पशूवधगृह तातडीने बंद करावे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे-पाटील यांना सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे आणि समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर हेही उपस्थित होते.
या पशूवधगृहाने राष्ट्रीय पर्यावरण प्राधिकरण अधिनियम, तसेच पर्यावरण विभाग अन् महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ यांच्या अनेक नियम आणि अटींचे उल्लंघन केले आहे, तसेच अनेक अवैध गोष्टी केल्या आहेत. या पशूवधगृहामुळे परिसरात झालेल्या पर्यावरण अन् सार्वजनिक आरोग्य यांच्या हानीला संबंधित पशूवधगृहाला उत्तरदायी धरून त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करावेत, असे राज्यंमत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

via Blogger http://ift.tt/2gVI1XY
from WordPress http://ift.tt/2hBSrQw
via IFTTT
No comments:
Post a Comment