शहरातील काही भागात माकडांचा हैदोस वाढलेला आहे.घरी एकट्या असणा-या महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.
अचलपुर शहराच्या काही भागात दिवसभर माकडांचा हैदोस पाहायला मिळत आहे.घरातील पुरुष मंडळी आपल्या रोजीरोटी करिता कामाच्या अथवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडल्यावर घरी एकट्या असणा-या महिला आपल्या घरगुती कामात असतांना या माकडांच्या झुंडी येतात व आपला हैदोस घालतात त्यामुळे महिलांना व छोट्या मुलांना घराबाहेर पडणेसुध्दा अशक्यप्राय होत आहे.या अक्राळविक्राळ माकडांना आवर घालने पुरूषांना अशक्य असतांना महिला काय करू शकतील यामुळे त्यांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.काहिवेळा घराचे दार उघडे असल्यास ही माकडे सर्रास घरात शिरून घरातील खाद्य वस्तू पळवत आहेत अश्या परिस्थितीत एखादे मुल किंवा महिला माकडांच्या तावडीत सापडल्यास मोठा अनर्थ संभवतो असेच काहीसे दहशतीचे वातावरण शहरातील रायपूरा परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे शिवाय या परिसरात नगरपालिकेची प्राथमिक शाळा असून येथे शिकत असलेल्या लहान विद्यार्थी व परिसरातील महिला तसेच जेष्ठ नागरिक यांचे जिवीतास धोका संभवतो तसेच ही वानरसेना परिसरातील झाडांचे सुध्दा नुकसान करून पर्यावरणाच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहेत तरी वनविभाग,नगरपालिका व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाने संबधित परिसरातील नागरिकांना व महिलांना या दहशतीच्या वातावरणातून मुक्तता देण्याचे दृष्टीने काही तरी उपाययोजना त्वरित करावी अशी जनतेची मागणी आहे.
via Blogger http://ift.tt/2n86zUN
from WordPress http://ift.tt/2mqyuvK
via IFTTT
No comments:
Post a Comment