जिल्ह्यात रोखरहित (कॅशलेस) व्यवहार व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज या चित्ररथांना हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रोखारहित व्यवहार व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी माहिती पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने हे चित्ररथ तयार करण्यात आले आहेत.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक तानाजी घोलप, दिलीप काळे आदी उपस्थित होते.
रोखरहित व्यवहारविषयी जनजागृतीकरिता तयार करण्यात आलेला चित्ररथ दि. १ मार्च ते दि. ११ मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यामध्ये फिरविला जाणार आहे. प्रत्येक तालुक्याचे ठिकाण, तहसीलदार कार्यालये, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रमुख चौक व संबंधित तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये या चित्ररथातील दूरचित्रवाणी संचावर रोखरहित व्यवहाराविषयी चित्रफितीद्वारे माहिती दिली जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ दि. १ मार्च ते दि. २३ मार्च २०१७ कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात धावणार आहे. या चित्ररथाद्वारेही चित्रफितीच्या माध्यमातून सामजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी माहिती देण्यात येणार आहे.
via Blogger http://ift.tt/2mEXO1p
from WordPress http://ift.tt/2mti0qg
via IFTTT
No comments:
Post a Comment