Latest News

ग्रामीण भागातील संस्थांनी लघु उद्योगातून प्रगती साधावी – श्री गणेश शिंदे

*अटल महापणन कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद


यवतमाळ-



 सहकारातील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, जिनिंग प्रेसिंग संस्था, तसेच खरेदी विक्री संस्थांनी लघु उद्योग स्थापन करून संस्था बळकट करण्यासोबतच सभासदांचीही आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन पुणे येथील निर्मिती उत्पादनचे संचालक गणेश शिंदे यांनी केले. ते अटल महापणन विकास अभियानांतर्गत गुरूवारी, दि. 2 मार्च रोजी आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
कार्यशाळेला जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, जिल्हा मार्केटींग अधिकारी बी. एस. डाखरे, जिल्हा विशेष लेखापरिक्षक एस. एस. बनसोड, सहाय्यक निबंधक अर्चना माळवे, वणी येथील वसंत जिनिंगचे अध्यक्ष देविदास काळे आदी उपस्थित होते.


गणेश शिंदे यांनी, संस्थेच्या संचालक मंडळाला घरी दैनिक गरजेच्या वस्तू लागतात त्याच वस्तू बाजारातून ठोक भावात आणून पहिले संचालक मंडळाने विकत घ्याव्यात. त्यानंतर संस्थेच्या सभासदांना विक्री करावी. त्यातुन कमी भांडवलातून संस्थेचा व्यवसाय सुरु होईल. शेतकरी उत्पादन घेतात, परंतू त्याची त्यांना विक्री मात्र करता येत नाही. त्यामुळे शेकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे ब्रान्डींग कंपनी करतात, जादा दराने विक्री करतात, मात्र उत्पादन करणाऱ्याला नफा कमी मिळातो. या उलट विक्री करणारा भरघोस नफा मिळवितो. त्यामुळे ग्रामीण भागातील संस्थांनी त्यांच्या सभासदांनी उत्पादित केलेल्या शेतमालाची ब्रान्डींगचे करावी, तसेच ते संस्थेच्या सभासदांना विक्री करावी.
राज्यातील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ, तसेच जिनिंग प्रेसिग संस्थांच्या बळकटीकरणासाठी अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, जिनिंग प्रेसिंग संस्था, तसेच ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे कर्मचारी, संचालकांची कार्यशाळा घेण्यात आली.
देविदास काळे यांनी जिनिंग संस्था नोंदणीपासून ते आजपर्यंत संस्थेने केलेली वाटचाल, तसेच संस्थेच्या भविष्यातील योजनांबाबत मार्गदर्शन केले. संस्थेच्या अडीअडचणींवर मात करुन संस्थेने प्रगती करावी, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील संस्थांनीही प्रगती करावी असे मत व्यक्त केले. सहाय्यक निबंधक सुचिता गुघाने यांनी अटल महापणन विकास अभियानातील विविध उपक्रमांची माहिती, तसेच संस्था बळकटीकरणासाठी करावयाच्या उपाययोजना सांगितल्या.
कार्यक्रमासाठी सहाय्यक निबंधक बालाजी काळे, मनोज भगत, हनुमंत आठवले यांनी पुढाकार घेतला. अजित डेहनकर यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक निबंधक अर्चना माळवे यांनी आभार मानले.

via Blogger http://ift.tt/2mYk8me




from WordPress http://ift.tt/2m7JNv1
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.