Latest News

अखेर महसुल विभागाला आली जाग अवैध रेती वाहतुक करणाऱ्या २ ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई



चांदुर रेल्वे – शहेजाद खान –





   तालुक्यात अनेक दिवसांपासुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांनी उच्छाद मांडला होता. बुधवारी कवठा कडु येथील शेतकऱ्यांनी स्वत:  पकडलेला ट्रॅक्टर व मिडीयातर्फे सुरू असलेला महसुल विभागाचा भांडाफोड यामुळे अखेर स्थानिक महसुल विभागाला जाग आली व अवैध रेती वाहतुक करणाऱ्या २ ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली.


            शहरातील बायपास रस्त्याने, घुईखेड गावातुन गेलेल्या एक्सप्रेस हायवेने, कवठा कडुसह इतरही अनेक गावांत चांदुर रेल्वे महसुल विभागाच्या आशिर्वादाने अवैध रेती माफीयांचा धुमाकुळ सुरू होता. या अवैध वाहतुकीने शासनाला चुना तर लागतच होता यासोबतच रस्त्यांचीही अक्षरश: वाट लागली आहे. असे असतांना झोपेचे सोंग घेतलेल्या महसुल विभागातर्फे अनेक दिवसांपासुन कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र बुधवारी कवठा कडु येथील शेतकऱ्यांनी पकलेला ट्रॅक्टर व यावर मिडीयाचा सुरू असलेला पाठपुरावा यामुळे अखेर अवैध रेती वाहतुक करणाऱ्या २ ट्रॅक्टरवर स्थानिक महसुल विभाकडुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तहसिलदार राजगडकर, मंडळ अधिकारी, पटवारी यांचा समावेश होता. या कारवाईमुळे रेती माफीयांचे धाबे नक्कीच दणाणले असुन कारवाईचे सत्र असेच सुरू राहुन अवैध रेती वाहतुकीला लगाम लावणार का हे पाहणे औचित्याचे आहे.

via Blogger http://ift.tt/2mj8THL




from WordPress http://ift.tt/2m3BEYF
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.