–
गेल्या अनेक दिवसांपासुन चांदुर रेल्वे शहरात मोबाईल व इतर लहान- मोठ्या चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. शहरात पोलिसांचा धाक संपला की काय असे चित्र दिसत आहे. कारण आठवडी बाजाराच्या दिवशी दोन व काही दिवसांपुर्वी बस स्थानक परीसरातुन एक मोबाईल लंपास झाला आहे. हे सत्र थांबत नसल्याने शहरवासीयांमध्ये पोलिसांविषयी प्रचंड असंतोष पसरला आहे.
प्राप्तमाहितीनुसार, शहरातील आठवडी बाजारात खरेदी करीत असतांना दोन शहरवासीयांचे २४ हजार ९९० रूपयांचे दोन मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. काही दिवसांपुर्वी तालुक्यातील बग्गी येथील महाविद्यालयीन युवकाचा बस स्थानक परीसरातुन महागडा मोबाईल लंपास झाल्याचीही घटना घडली होती. यापुर्वी सुध्दा आठवडी बाजार, बसस्थानक परीसरातुन अनेक मोबाईल, पैसे लंपास झाल्याच्या घटना घडल्या. मात्र सुस्त पोलीस प्रशासनाला अजुनही जाग आलेली नाही. अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या चांदुर रेल्वे शहरातील मोबाईल चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. बसस्थानक परीसरात सायंकाळ दरम्यान बसमध्ये चढतेवेळी प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. याच गर्दीचा फायदा अनेक चोरटे घेतात. त्यामुळे दररोज बसस्थानक परीसरात व रविवारी आठवडी बाजारात पोलीसांचा बंदोबस्त असणे आवश्यक आहे.
via Blogger http://ift.tt/2jVgefd
from WordPress http://ift.tt/2jTHk3W
via IFTTT
No comments:
Post a Comment