चांदूर रेल्वे / शहेजाद खान /—
चांदूर रेल्वे तालुका सेवानिवृत्त कर्मचारी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व तालुका मेळावा स्थानिक महिला महाविद्यालयात उत्साहात पार पडला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.प्रभाकर वाघ, प्रमुख पाहूणे म्हणुन अमरावती सेवानिवृत्त कर्मचारी संघटनचे सचिव निवाने, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी देशमुख, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी जगदिश सायरीमल उपस्थित होते. यावेळी मान्यवराच्या हस्ते पंच्याहत्तरी पुर्ण करणाNया २२ सेवानिवृत्त कर्मचाNयाचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्याथ्र्यांना पारितोषिक देऊन सन्मान केला. यावेळी प्रा.प्रभाकर वाघ यांनी नोटाबंदीमुळे सेवानिवृत्त कर्मचाNयांना अनेक अडचनीला तोंड द्यावे लागल्याचे सांगीतले. श्री.देशमुख यांनी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे कार्य व महत्व यावर प्रकाश टाकला. भविष्यात येणाNया अडचनी सोडविण्यासाठी संघटना प्रत्येक सदस्यांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी दिली. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची पुढील तीन वर्षासाठीची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी कृष्णकुमार पाटील, उपाध्यक्ष-चंद्रभान खोब्रागडे, सचिव-मधुकर तायडे, सहसचिव आर.के.राऊत, कोषाध्यक्ष अशोक बोबडे यांच्यासह कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली. या मेळाव्याला चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2i5ACqF
from WordPress http://ift.tt/2j3Rwd8
via IFTTT
No comments:
Post a Comment