येथील आयटीआय महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी हिंदूंचा गौरवशाली इतिहास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ३१ डिसेंबरला रात्री मद्यधुंद होऊन गाडी चालवणे, पार्ट्या करणे, फटाके वाजवणे म्हणजे एका दिवसाचे धर्मांतर आहे. छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने ताठ उभे असलेले गड, किल्ले हे आपल्या जाज्वल्य शौर्यशाली इतिहासाचे प्रतीक आहेत. अशा गडकिल्यांवर मद्य पिणे आणि मेजवान्या करणे म्हणजे शिवरायांचा आणि सर्व मावळे ज्यांच्या मुळे आपण आज हिंदू म्हणून जिवंत आहोत, त्या सर्वांचा अपमान आहे. आपली शिक्षणपद्धती माणसाला सुशिक्षित बनवते; पण हिंदु धर्म मानवाला सुसंस्कृत बनवतो; म्हणून सर्वांनी हिंदु धर्माचे शिक्षण घेतले पाहिजे, असे प्रबोधनपर मार्गदर्शन श्री. सुर्वे यांनी या वेळी केले.
via Blogger http://ift.tt/2ix8Tjk
from WordPress http://ift.tt/2hLyEzs
via IFTTT
No comments:
Post a Comment