जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची परीक्षा जवळ आली आहे. या जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पडघम वाजू लागले असून शक्य झाल्यास जिल्हा परिषदेच्या ३ ही जागा स्वबळावर लढवू शकते. असे झाल्यास एमआयएमची ही तालुक्यातील पहिलीच निवडणुक राहणार असुन यामध्ये कॉंग्रेस व भाजपापासुन दलित- मुस्लीमांच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने कंबर कसली आहे. महाराष्ट्रात पकड घट्ट करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कोअर कमिटीची स्थापना करून प्रत्येक जिल्हा, शहरात, तालुक्यात कार्यकारी जाहीर करण्याचे आदेश दिले होते. याच धर्तीवर तालुक्यात सुध्दा लवकरच कार्यकारीणी गठीत होणार असुन जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत घुईखेड, पळसखेड व आमला सर्कलमध्ये उमेदवार उभे करण्याचे संकेत मिळत आहे. घुईखेड, पळसखेड, आमला सर्कलमध्ये एमआयएमला चांगला उमेदवार मिळून कॉंग्रेस व भाजपापासुन दलित व मुस्लिमांच्या मतांच विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घुईखेड सर्कल सर्वसाधारण महिलेकरीता राखीव असुन पळसखेड सर्कल अनुसुचित जातीच्या पुरूषाकरीता व आमला सर्कल अनुसुचित जातीच्या महिलेकरीता राखीव आहे. तालुक्यात दलीत व संख्या जास्त असल्यामुळे एमआयएमला तालुक्यात फायदा होऊ शकतो. त्यामुळे एमआयएमचा जय भीम जय मिम चा नारा घुईखेड, पळसखेड, आमला सर्कलमध्ये लागेल का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. याबाबत एमआयएम अमरावतीचे अब्दुल नाजीम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, चांदुर रेल्वे तालुकावासीयांशी आम्ही चर्चा केली असुन लवकरच कार्यकारीणी गठीत करण्यात येणार आहे. सोबतच पार्टीचे तालुक्यात दलीत- मुस्लीम मतदारांच्या संख्येबाबत सर्वेक्षण सुरू असुन लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचेही सांगितले.
via Blogger http://ift.tt/2j3QCxj
from WordPress http://ift.tt/2j3TsCB
via IFTTT
No comments:
Post a Comment