Latest News

शेगांव प्रेस क्लब व साप्ताहिक ज्ञानगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित नगरपरिषद अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार

शेगांव : -समीर देशमुख /मनोज वर्मा सह महेंद्र मिश्रा

येथील शेगांव प्रेस क्लब व साप्ताहिक ज्ञानगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने  नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्ष व सदस्यांचा तसेच कृउ.बा.स.च्या सभापती व उपसभापती व मावळते नगराध्यक्षांचा सत्कार शेगांव प्रेस क्लबच्या कार्यालयात सदस्याच्या हस्ते करण्यात आला.
सत्काराच्या कार्यक्रमास शेगांव प्रेस क्लब अध्यक्ष महेंद्र व्यास, ठाणेदार यशवंत बाविस्कर, जेष्ठ पत्रकार डॉ.जयंत खेळकर, शरदकुमार अग्रवाल, न.प.सदस्य तथा नगराध्यक्ष सौ.शकुंतलाबाई बुच यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेचे व बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुजनाने व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्याचे स्वागत प्रेस क्लब सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्षा सौ.शकुंतलाबाई बुच यांचा सत्कार शेगांव प्रेस क्लबचे अध्यक्ष महेंद्र व्यास तथा ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून करण्यात आला. याचबरोबर एकुण २६ नगरसेवकांचा स्मृतिचिन्ह देवून शेगांव प्रेस क्लबच्या सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कृ.उ.बा.समितीचे नवनियुक्त सभापती गोqवदराव मिरगे उपसभापती सुनिलभाऊ वानखडे यांचाही स्मृतिचन्ह देवून प्रेस क्लबच्या वतीने सदस्यांनी सत्कार केला.
यावेळी ठाणेदार यशवंत बाविस्कर, डॉ.जयंतराव खेळकर, शरदकुमार अग्रवाल, गोविंद मिरगे, गोपाल कलोरे, संतोष देशमुख यांनी समोयचित मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
शेगांव नगर पालिकेचे काम करतांना शेगांव शहराचा विकासत्मक कार्यासाठी आपण सदैव प्रयत्न करणार असे यावेळी सत्काराला उत्तर देतांना नगरसेवकांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमास शेगांव प्रेस क्लबचे विजय मिश्रा, बद्रीप्रसाद अवस्थी, देवानंद उमाळे, गजानन कलोरे, महेंद्र व्यास, दिपक सुरोशे, भावेश शर्मा, अमर बोरसे, समिर देशमुख, महेंद्र मिश्रा, मनोज वर्मा, विजय निखारे, देविदास कळसकार, मुरलीधर काळे, सतिष अग्रवाल, श्याम देशमुख, गोविंद धंदर तसेच साप्ताहिक ज्ञानगंगाचे संपादक संतोष निखारे तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शेगांव प्रेस क्लब पदाधिकारी, सदस्य व साप्ताहिक ज्ञानगंगा परिवार प्रयत्न केले तर संचालन सचिव गजानन कलोरे यांनी केले. आभार प्रदर्शन विजय मिश्रा योनी केले

via Blogger http://ift.tt/2hvt9ko




from WordPress http://ift.tt/2i5WwKz
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.