अचलपूर शहरातील काँग्रेस चे जेष्ठ नेते व नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष जहिरूल हसन उर्फ जहिरबाँस यांचे दुख:द निधन झाले
अचलपूर शहरातील जेष्ठ काँग्रेसचे नेते व नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष जहिरूल हसन यांचे २१ डिसेंबर ला रात्री ८.३० च्या दरम्यान त्यांचे राहते घरी तिव्र ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुख:द निधन झाले.ते १९८५ पासून सतत नगरपालिकेवर निवडून आले व सक्रीय नगरसेवक म्हणून कार्यरत होते तसेच काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले तसेच इतर पक्षांसोबत त्यांचे सलोख्याचे संबध होते.अल्पसंख्याक समूहासह इतर सर्वांसाठी ते नेहमी मार्गदर्शक ठरले.शहरातील विविध सामाजिक संघटना,शैक्षणिक संस्था सोबत त्यांनी कार्य केले शांतता समितीचे सदस्य असून आपल्या अनोख्या व हसत मुख शैलीच्या भाषणाने सर्वांचे मनापासून आवडते व्यक्तिमत्व त्यांचे होते.त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी समजताच विविध सामाजिक संस्था,राजकीय पक्ष व त्यांच्या चाहत्यांनी धाव घेवून त्यांचे अंतीम दर्शन घेतले त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले तसेच शहरातील एक तडफदार नेतृत्व हरपल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.
via Blogger http://ift.tt/2hLVaH5
from WordPress http://ift.tt/2i5ZMpe
via IFTTT
No comments:
Post a Comment