Latest News

राष्ट्राचा उत्कर्ष साधणार्‍या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत होऊया !

वरळी (मुंबई) येथील ‘स्टार बॉईज ग्रुप च्या कार्यक्रमात
सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचे आवाहन 
मध्यभागी मार्गदर्शन करतांना श्री. अभय वर्तक, त्यांच्या डाव्या बाजूला
हिंदू राष्ट्रसेनेचे मुंबई अध्यक्ष श्री. नागेश मढवी आणि समवेत पदाधिकारी

   मुंबई- स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही स्वीकारली; मात्र लोकशाहीने आपल्याला काय दिले, यावर चिंतन होणे आवश्यक आहे. लोकशाहीत निवडून येण्यासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबला जात आहे. आतंकवाद, गुंडगिरी, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. लोकशाही पूर्णत: अपयशी ठरली आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच राष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमात्र उपाय आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांनी कार्यरत होऊया, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. स्टार बॉईज गु्रप च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात धर्मविषयी मार्गदर्शन करण्यासाठी श्री. वर्तक यांना निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी हिंदू राष्ट्रसेनेचे मुंबई अध्यक्ष श्री. नागेश मढवी, स्टार बॉईज ग्रुपचे सर्वश्री भूषण कांबळे, रूपेश महाडिक, रोहन पाटील यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला सहस्रोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.     या वेळी श्री. अभय वर्तक म्हणाले, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या झाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्यात येत आहे. सनातन संस्थेने दाभोलकर यांचा भ्रष्टाचार उघड केला, पुरोगाम्यांचा नास्तिकतेचा प्रसार खोडून काढला, हा सनातनचा गुन्हा आहे का ? हिंदुत्वनिष्ठांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या करणार्‍या पोलिसांना हिंदु धर्मावर चिखलफेक करणार्‍या पुरोगाम्यांना रोखता येतही. मुंबई येथे रझा अकादमीच्या मोर्च्यात महिलांवर अत्याचार करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्यास पोलीस कचरतात. देशात आतंकवादी मोकाट वावरत आहेत; मात्र राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष श्री. धनंजयभाई देसाई, अध्यात्मप्रसार करणारे सनातनचे साधक समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. हे सर्व १०० टक्के निरपराध आहेत. हिंदुत्वनिष्ठांचा छळ रोखण्यासाठी आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. 
   या वेळी श्री. अभय वर्तक यांनी उपस्थित हिंदूंना हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचे आवाहन केले. शेकहॅन्ड न करता नमस्कार करा, मम्मी-पप्पा म्हणण्याऐवजी आई-बाबा म्हणा, हॅलो म्हणण्याऐवजी नमस्कार म्हणा, अशा प्रकारे नियमितपणे हिंदु संस्कृतीनुसार आचरण करावे, असेही त्यांनी सांगितले. 
   स्टार बाईज ग्रुपच्या वतीने शाल आणि श्री गणेशाची प्रतिमा देऊन श्री. अभय वर्तक यांचा सत्कार करण्यात आला. दीपोत्सवाच्या कार्यक्रमात धर्मप्रसारासाठी वेळ दिल्याविषयी श्री. अभय वर्तक यांनी स्टार बॉईज ग्रुपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले.

via Blogger http://ift.tt/2eWw1bp




from WordPress http://ift.tt/2ferM9p
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.