Latest News

भाविकांचे श्रध्दास्थान फत्तेपुर बाबा – मुक्या जनावरांसाठी ठरतात जीवनसंजीवनी

येरड बाजार येथे भरते यात्रा
चांदूर रेल्वे- (शहेजाद खान)


चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) एकलारा हे गाव बेंबळा प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे पुनर्वसन खरबी (मांडवगड) येथे करण्यात आले असून या तिन्ही गाव मिळून तीन हजार लोकसंख्या वस्ती असलेले येरड खरबी हे गाव या तिन्ही फत्तेपूर बाबांची पुरातन दगडाची मूर्ती आहे. ही फत्तेपूर बाबांची दगडाची मूर्ती निंबाच्या झाडाखाली असून हे निंबाचे झाड बाराही महिने हिरवेगारच असते. हे एक या ठिकाणचे वैशिष्ट्ये आहे. आता त्या ठिकाणी एक छोटेसे मंदिर बांधण्यात आले.
दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी बलिप्रतिपदेला फत्तेपूर बाबांच्या नावाने येरड खरबी येथे यात्रा भरते. फत्तेपूर बाबा हे एक जनावरांसाठी देवच मानल्या जाते. गाई, बैल, म्हशी, बकरी इत्यादी जनावरे बिमार झाल्यास फत्तेपूर बाबांच्या नावाने अंगारा लावल्यास बिमारी दुरुस्त होते. असा अनुभव अनेक लोकांना आला आहेत. फत्तेपूर बाबावर अनेक लोकांची अफाट श्रद्धा  आहे.
या ठिकाणी बाबांच्या नावाने पाच हजार नारळ फुटतात. या परिसरातील घुईखेड, टिटवा, जवळा, धोत्रा, राजुरा, सुलतानपूर, धामक, वाघोडा, बोरी येथील हजारो लोक आपल्या जनावरांना घेवून दर्शनासाठी येतात. आपल्या गाईंना सजवून हवसे, गवसे, नवसे, गवळण घेवून वाजत गाजत फत्तेपूर बाबांच्या दर्शनासाठी येतात. येरड येथील प्रकाश देशमुख यांच्याकडून दहीहांडी व काल्याचा कार्यक्रम पार पडतो. तसेच येरड येथील प्रमोद शेखदार यांचे अवधुती भजन मंडळीचा कार्यक्रम सुंदर अशा तालासुरान पार पाडल्या जातो. यात्रेत येणार्‍या भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला जातो. या महाप्रसादाचा अनेक भक्तगण लाभ घेतात. या ठिकाणी येरड येथील गुणवंतराव गुल्हाने यांचे आजोबा पुजारी म्हणून काम करीत होते. आता त्यांचा वारसा म्हणून काम करीत आहे. गुणवंत गुल्हाने सांगतात की माझे आजोबा हे फत्तेपूर बाबांच्या नावाने औषध बनवून लोकांना नि:शुल्क देत होते आणि त्या औषधांचा जनावरांना मान घडत होता. हे फत्तेपूर बाबांची ही दगडाची मूर्ती पुरातन काळातील असून हे फत्तेपूर बाबा हे साक्षात देव आहेत असे येरड खरबी येथील लोक सांगतात.

via Blogger http://ift.tt/2emtXsI




from WordPress http://ift.tt/2eyS6Kf
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.