नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनाला मिळालेले यश !
नंदुरबार – शहरातील फटाके विक्रेत्यांच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची, तसेच चीन उत्पादित फटाक्यांची विक्री करणार नाही, असा निर्धार फटाके विक्रेत्यांनी या बैठकीत व्यक्त केला.
१. हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांच्या चित्रांच्या चिंधड्या उडून विटंबना होते आणि धर्मभावनाही दुखावल्या जातात; म्हणून या फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीने अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना नुकतेच दिले होते.
२. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आणि विषारी असलेल्या अन् भारत सरकारने बंदी घातलेल्या रसायनांचा वापर चिनी फटाक्यांमध्ये केलेला असतो; म्हणून नंदुरबारमध्ये चिनी फटाक्यांच्या विक्रीला बंदी घालावी, तसेच असे फटाके विक्री करतांना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही समितीने केली होती.
३. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी फटाके विक्रेत्यांची बैठक घेतली. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजीराव गावित, शहर पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी विक्रेत्यांना कायदे आणि नियम यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनीही प्रबोधन केले. बैठकीला ३५ फटाके विक्रेते उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2ds2gQg
from WordPress http://ift.tt/2eptC6p
via IFTTT
No comments:
Post a Comment